सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात किती चांगली मैत्री आहे हे मैदानासोबतच मैदानाबाहेरही अनेकदा दिसून आलं आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी हे दोन्ही खेळाडू अत्यंच महत्त्वाचे आहेत. गेल्या हंगामात करोनामुळे सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर दोघांमध्ये संबंध बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या.
मात्र, या हंगामात वेगळं चित्र आहे. दोघांमधील घनिष्ठ मैत्री पुन्हा एकदा दिसून येतेय. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन धोनी आणि रैनाच्या शेअर केलेल्या फोटोवर सुरेश रैनाने केलेली एक कमेंट याचाच पुरावा म्हणावा लागेल.
चेन्नई सुपर किंग्सने रैना आणि धोनीचा सरावादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला. फोटोत दोघं हातातल्या बॅटकडे बघून काहीतरी चर्चा करत आहेत. या फोटोवर रैनाने कमेंट केली…”नेहमी नजरेला नजर भिडायलाच पाहिजे असं नाही…एकमेकांची मनं मात्र नेहमी जुळलेली आहेत”. कमेंट करताना रैनाने धोनीलाही टॅग केलं. त्यानंतर हा फोटो आणि त्यासोबत रैनाची कमेंट व्हायरल होत असून चेन्नईच्या चाहत्यांना ही प्रतिक्रिया भलतीच आवडलीये. तुमची मैत्री नेहमी अशीच राहूदे, अशा कमेंट्स अनेक चाहते करत आहेत. तर, रैना आणि धोनी या दोघांना पुन्हा एकत्र खेळताना बघायला खूपच उत्सुक आहोत ,अशा कमेंट्सही अनेक चाहते करत आहेत.
“Not always eye to eye, but always heart to heart!! @msdhoni https://t.co/z5H4qt8Zqq
— Suresh Raina (@ImRaina) March 31, 2021
आणखी वाचा- IPL 2021 : ‘भाई ये क्यों खेल रहा है?’ म्हणणाऱ्यांना हरभजन सिंगने दिलं सणसणीत उत्तर
दरम्यान, मुंबईमध्ये चेन्नईच्या सरावाला सुरूवात झाली आहे. पण आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी जेमतेम ९ दिवस शिल्लक असताना धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला मोठा धक्का बसलाय. संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणार असून गुरूवारी हेझलवूडने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल सुरू होण्यासाठी अगदी कमी दिवस असताना आता हेझलवूडसाठी योग्य पर्याय निवडण्याचं मोठं आव्हान चेन्नईसमोर असेल.