आयपीएल स्पर्धेपूर्वी लिलावात कोणता खेळाडू किती किंमतीत खरेदी केला जातो यावर अंदाज बांधले जात असतात. एखाद्या खेळाडूची कामगिरी पाहता संघ प्रशासक कोट्यवधी रुपये मोजतात. खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी वरचढ बोली लावतात. २०२१ स्पर्धेतही कोट्यवधी रुपये मोजून खेळाडू घेतले गेले. मात्र त्यापैकी महागड्या चार खेळाडूंना मैदानात खेळण्याची अद्याप संधी मिळालेली नाही. आयपीएल पर्व मध्यावर आलं असूनही संधी मिळत नसल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

कृष्णप्पा गौतम, पीयूष चावला, सॅम बिलिंग्स आणि डेविड मलान यांना कोट्यवधी रुपये खर्च करून संघांनी विकत घेतलं. मात्र अंतिम ११ खेळाडूत खेळण्याची संधी मिळाली नाही. कृष्णप्पा गौतम (९.२५ कोटी), पीयूष चावला (२.४० कोटी), सॅम बिलिंग्स (२ कोटी), डेविड मलान (१.५ कोटी) हे खेळाडू इतके रुपये खर्च करून खरेदी केले गेले आहेत.

‘या’ खेळाडूंनी आयपीएलच्या पहिल्या षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा

चेन्नई सुपर किंग्सनं पहिल्या सामना गमवल्यानंतर सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे. या संघानं कृष्णप्पा गौतमला ९.२५ कोटी खर्च करून खरेदी केलं आहे. मात्र अष्टपैलू खेळाडू असलेल्या कृष्णप्पाला अजून एकही संधी मिळाली नाही. तर संघातील ११ खेळाडूंची प्रदर्शन पाहता त्याला संधी मिळणं कठीण दिसत आहे. पीयूष चावलाला मुंबई इंडियन्सनं २.४० कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. त्याचा अनुभव पाहता संघ प्रशासनाने हा निर्णय घेतला. चेन्नईने लिलावापूर्वी पीयूषला रिलीज केलं होतं. पीयूषने १६४ सामन्यात १५६ गडी बाद केले आहेत. मात्र त्याला या स्पर्धेत मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही.

VIDEO : ६ चौकार खाल्ल्यानंतर KKRच्या शिवम मावीने धरली पृथ्वीची मान!

महागड्या खेळाडूंच्या यादीत दोन परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. त्यांना अद्यापही मैदानात कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली नाही. यात इंग्लंडचा सॅम बिलिंग्स आणि डेविड मलान हे दोन खेळाडू आहेत. सॅम बिलिंग्स ( २ कोटी), तर डेविड मिलानला (१.५ कोटी) रुपयांना खरेदी केले आहे. सॅमला दिल्लीनं २ कोटी खर्च करून खरेदी केले आहे. तो मैदानात कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे डेविड मिलानलाही पंजाबनं १.५ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलं आहे. त्याला अद्यापही ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. मात्र पंजाबचा स्पर्धेतील उतरता आलेख पाहता त्याला सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader