रविवारी आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयासह, आरसीबीने प्लेऑफच्या दिशेने पावले टाकली आहेत. या सामन्यानंतर मैदानात एक भावून क्षण सर्वांना पाहायला मिळाला. मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीशी बोलताना दिसला. या दरम्यान, तो खूप भावूक दिसत होता आणि कोहली त्याच्याशी बोलताना आणि त्याचे मनोबल उंचावताना दिसला.

बंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना सपशेल निराशा केली. त्यात इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने केवळ ९ धावा केल्या. यजुर्वेंद्र चहलने त्याची महत्त्वाची विकेट आपल्या नावावर केली. रोहित बाद झाल्यानंतर संघाला स्थिरता हवी असताना इशानने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शिवाय चहलनेही तो तंबूत परत असताना काही टिपणी केली.

सामन्यानंतर विराट कोहली आणि इशान किशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक कप्तान कोहलीची स्तुती करत आहेत, त्याचबरोबर इशान किशनलाही वाईट काळात धैर्य बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इशानने गेल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही दणका दिला. आयपीएल २०२० मध्ये इशान किशनने १४ डावांमध्ये ५१६ धावा केल्या, ज्यात ४ वादळी अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्याने या मोसमात ३० षटकारही ठोकले, पण यंदाच्या हंगामात त्याची कामगिरी सुमार राहिली.

हेही वाचा – RCB vs MI : विराटनं वाढवलं रोहितचं टेन्शन! सामना नावावर केला आणि आता…

इशानने या हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत आणि फक्त १०७ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत सध्याचा फॉर्म बघता इशान विरासमोर स्वतःला रोखू शकला नाही आणि भावनिक झाला. मात्र, विराटने या युवा फलंदाजाशी संवाद साधून त्याला प्रोत्साहन दिले. विराटच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Story img Loader