आयपीएल २०२१मध्ये एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुचा ४ गडी राखून पराभव केला. यासह बंगळुरुला पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीने मोक्याच्या क्षणी चुका केल्या आणि त्यांना त्याचा फटका बसला. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने बंगळुरुच्या संघनिवडीवर टीका केली. त्याने आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डॅन ख्रिश्चनवर नाव न घेता निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेहवागने आरसीबीसाठी एक ट्वीट केले. तो म्हणाला, ”बंगळुरुसाठी वाईट वाटत आहे. बहुतेक सामन्यात १० खेळाडूंसह खेळण्याचा फटका आज बसला. नशीबवान खेळाडू खेळवायचा होता, तर कर्ण शर्मापेक्षा चांगला कोण आहे?”. या ट्वीटमधून सेहवागने नशीबवान खेळाडू म्हणून ओळख असलेल्या डॅन ख्रिश्चनवर निशाणा साधला. ख्रिश्चनने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात सुमार गोलंदाजी केली. सुनील नरिनने त्याच्या एका षटकात २२ धावा चोपल्या. लीगमध्ये त्याला एकूण १४ धावाच करता आल्या.

यासाठी ख्रिश्चन नशीबवान

जगभर झालेल्या टी-२० स्पर्धांध्ये ख्रिश्चनचा सहभाग होता. विशेष म्हणजे, ख्रिश्चन सहभागी असलेल्या संघानी विजेतेपदे जिंकली आहे. ख्रिश्चनने २०१७मध्ये नॉट्स आऊटलाऊजच्या नेतृत्वात टी-२० ब्लास्टचे विजेतेपद जिंकले आणि त्याच वर्षी ट्रिनबागो नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. २०१८मध्ये, तो जोझी स्टार्स संघाचा सदस्य होता. या संघाने मझांसी सुपर लीग जिंकली. २०१९मध्ये ख्रिश्चनने मेलबर्न रेनेगेडससाठी बिग बॅश लीगचे जेतेपद जिंकले. मागील वर्षी ख्रिश्चनने नॉट्स आउटला विजेतेपद मिळवून दिले.

हेही वाचा – “IPLमधील शेवटच्या सामन्यापर्यंत….”, कप्तान म्हणून शेवटचा सामना खेळलेल्या विराटनं आपल्या शब्दांद्वारे जिंकली मनं!

आयपीएल आणि ख्रिश्चन

डॅन ख्रिश्चन यंदा आरसीबीसंघात परतला. आयपीएल २०२१च्या लिलावात ख्रिश्चनला आरसीबीने ४.८ कोटी रुपयांत खरेदी केले होते. यापूर्वी २०१३च्या मोसमात तो या संघाचा एक भाग होता. आरसीबी व्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, राइझिंग पुणे सुपरजायंट्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 virender sehwag trolls rcb for team selection in league adn