श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वनिंदू हसरंगा याने आयपीएलम २०२१मधून एक्झिट घेतली आहे. आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी आरसीबीकडून खेळणाऱ्या हसरंगाने संघाला अलविदा म्हटले. आता तो टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंका संघात सामील होईल. आरसीबी संघ सोडण्यापूर्वी हसरंगाने भावनिक संदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वनिंदू हसरंगाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आणि आरसीबीने या मोसमात जेतेपद पटकावण्याची आशा व्यक्त केली. त्यांनी लिहिले, ”मी आरसीबी संघाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या संघाने प्लेऑफमध्ये चांगली करावी, असे मला वाटते. या वर्षी आम्ही विजेतेपद पटकावू अशी आशा आहे. आरसीबीमधील माझा अनुभव छान होता. आम्ही येथे अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात राहिलो. या संधीसाठी मी फ्रेंचायझीचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो.”

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या उत्तरार्धात वनिंदू हसरंगाला करारबद्ध केले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झम्पाने आपले नाव मागे घेतल्यानंतर हसरंगाचा आरसीबीच्या संघात समावेश करण्यात आला. वनिंदू हसरंगा एक उत्तम फिरकी गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी खूप चांगली होती. मात्र आयपीएलमध्ये त्याला खास करता आले नाही. त्याने संघासाठी दोन सामने खेळले आणि यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

आरसीबी संघाने चांगली कामगिरी करत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. आज एलिमिनेटर सामन्यात ते कोलकाता नाइट रायडर्सशी भिडतील. हा सामना जिंकून संघ विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकू इच्छितो.