इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आज गुरुवारी (२४ फेब्रुवारी) आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याआधी स्पर्धेचा उद्घाटन सामना २७ मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत होते, परंतु बीसीसीआयने ब्रॉडकास्टरच्या मागणीनुसार २६ मार्च ही तारीख निश्चित केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी क्रिकबझशी केलेल्या संभाषणात खुलासा केला, की ही स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. यावेळी रिकाम्या स्टेडियममध्ये सामने होणार नाहीत. म्हणजेच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. साखळी फेरीदरम्यान त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार घेतला जाईल. स्टेडियममध्ये किमान २५ किंवा ५० टक्के प्रेक्षक उपस्थित असतील.

व्हर्च्युअल बैठकीत गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलची लीग फेरी महाराष्ट्रात होणार असल्याची पुष्टी केली आहे. मुंबईत ५५ आणि पुण्यात १५ सामने होणार आहेत. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जातील. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर २० सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर १५ सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत. प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये होऊ शकतात, परंतु अंतिम निर्णय झालेला नाही.

हेही वाचा – IND vs SL : रोहित शर्मानं रचला वर्ल्ड रेकॉर्ड..! टी-२० क्रिकेटमध्ये हिटमॅन ठरला नवा किंग

बीसीसीआयने सरावासाठी चार मैदाने निवडली आहेत. यावर गव्हर्निंग काऊन्सिल बराच काळ विचार करत होती. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी मैदान, दक्षिण मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदान आणि कांदिवली किंवा ठाण्यातील एमसीए मैदानावर संघ सराव करू शकतात. यासाठी सर्व संघांना ठराविक कालावधी देण्यात येणार आहे.