इंडियन प्रीमियर लीगची नवीन फ्रेंचायझी अहमदाबाद संघाने आपले नाव जाहीर केले आहे. अहमदाबाद फ्रेंचायझी आयपीएलच्या १५व्या हंगामात ‘गुजरात टायटन्स’ या नावाने मैदानात उतरणार आहे. आज बुधवारी ही घोषणा करण्यात आली. याआधी हा संघ अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाणार, असे वृत्त आले होते.
अहमदाबादने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे, तर शुबमन गिल आणि अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. कोचिंग स्टाफमध्ये आशिष नेहरा आणि गॅरी, कर्स्टनचा समावेश आहे.
अहमदाबादने राशिद आणि हार्दिकला १५-१५ कोटींमध्ये संघाशी जोडले आहे. हार्दिक पंड्या याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता, तर राशिद खान आयपीएलच्या १४व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. शुबमन गिल गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता.
हेही वाचा – IND vs WI 2nd ODI Live : रोहितनं गमावला टॉस; पोलार्ड संघाबाहेर!
यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे लिलाव होणार आहे.