आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमियर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या दोन दिवसीय लिलावाची आजपासून बंगळुरु येथे सुरुवात झाली. दुपारी एक वाजल्यापासून लिलाव सुरु झाला. मात्र लिलाव सुरु झाल्यानंतर सव्वा तासांनंतर अचानक लिलाव थांबवण्यात आला. या लिलावामधील लिलाव करणारे म्हणजेच ऑक्शनर असणारे ह्यूज एडमीड्स अचानक कोसळले आणि एकच गोंधळ उडाला. ह्यूज एडमीड्स हे नक्की कशामुळे पडले हे समोर आलेलं नाही मात्र यामुळे उपस्थित संघ मालक आणि व्यवस्थापकांनाही धक्का बसल्याचं पहायला मिळालं.
नक्की वाचा >> IPL Auction 2022: शाहरुखच्या KKR ला मिळाला मुंबईकर कॅप्टन?; तब्बल १२.२५ कोटींना संघात दिलं स्थान
श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात असताना ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (hugh edmeades)अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे ऑक्शन थांबवण्यात आलं. लंचची घोषणा करण्यात आली असून एडमीड्स यांच्या प्रकृतीबाबत थोड्याच वेळात अपडेत देण्यात येईल असं लंचची घोषणा करताना सांगण्यात आलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा