आयपीएलच्या लिलावामध्ये भारताचा डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला लिलावामधील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळाला आहे. धवनला पंजाब किंग्जने ८ कोटी २५ लाखांना विकत घेतलं आहे. धवनची बेस प्राइज दोन कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच बेस प्राइजच्या चौपट किंमतीला धवनला पंजाबने विकत घेतलंय. या लिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले आहेत.

पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागणार आहे. लिलावाआधी १० संघांनी ३३ खेळाडूंना रिटेन केलं आहे. प्रत्येक संघाला किमान १८ तर सर्वाधिक २५ खेळाडू संघात घेण्याची मूभा आहे. यंदा लिलावामध्ये प्रत्येक संघाला खेळाडूंवर ९० कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिलीय. या लिलावामध्ये खेळाडूंवर ९०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
Australia make significant changes to squad for two Tests sports news
मॅकस्वीनीला डच्चू, कोन्सटासला संधी; अखेरच्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलिया संघात महत्त्वपूर्ण बदल
IND vs AUS Australia squad announced for 3rd 4th test Sam Konstas and Jhye Richardson Added in Team
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघात मेलबर्न-सिडनी कसोटीसाठी दोन मोठे बदल, १९ वर्षीय खेळाडूला दिली संधी
India Women Beat West Indies by 60 Runs in decider to win first home T20I series in five years
INDW vs WIW: भारतीय महिला संघाने संपवला ५ वर्षांचा दुष्काळ, वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिका विजय

नक्की पाहा >> IPL Auction 2022: लिलाव सुरु असताना अचानक ऑक्शनर कोसळला अन्…; धक्कादायक Video व्हायरल

मागील पर्वामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या धवनसाठी आधी दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली. त्यानंतर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही धवनसाठी बोली लावली. मात्र शेवटपर्यंत पंजाबची बोली सर्वोच्च राहिली. मागील पर्वामध्ये धवनला ५ कोटी २० लाख रुपयांना दिल्लीने आपल्या संघात घेतलं होतं. म्हणजेच यंदाच्या पर्वात धवनला ३ कोटींचा फायदा झालाय. आता धवन मयंक अग्रवालसोबत पंजाबसाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना दिसेल.

नक्की वाचा >> IPL Auction 2022: शाहरुखच्या KKR ला मिळाला मुंबईकर कॅप्टन?; तब्बल १२.२५ कोटींना संघात दिलं स्थान

३६ वर्षीय धवनची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने ३०० डावांमध्ये ८ हजार ७७५ धावा केल्यात. यामध्ये दोन शतकं आणि ६३ अर्थशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट १२५ इतका आहे. मागील पर्वामध्ये त्याने पृथ्वी शॉसोबत दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना सलामीवीर म्हणून भन्नाट कामगिरी केली. टी-२० विश्वचषकाच्या संघात मात्र धवनला जागा मिळाली नव्हती.

पंजाबच्या संघाने कधीच आयपीएल जिंकलेलं नाही. त्यामुळेच पंजाबने अधिक पैसे खर्च करुन आपली फलंदाजी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय. संघाने केवळ दोन खेळाडू रिटेन केलेत. मागील पर्वातील कर्णधार के. एल. राहुलनेही पंजाबची सोबत सोडलीय. आता राहुल हा लखनऊ संघाचा कर्णधार आहे.

Story img Loader