महान फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज डेल स्टेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सहभागी झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने लाराला फलंदाजी प्रशिक्षक आणि स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. टॉम मूडी हे हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज लाराला फ्रेंचायझीने धोरणात्मक सल्लागार बनवले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिच सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि स्काऊट अशी दुहेरी भूमिका निभावणार आहेत. मुथय्या मुरलीधरनसारखा दिग्गज या फ्रेचायझीशी आधीच संबंधित आहे. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच मुरलीधरन संघासाठी रणनीतीही आखतो.

हेही वाचा – VIDEO : किती तो ब्रोमान्स..! कॅप्टननं आपल्या खेळाडूला मैदानात केलं KISS; पाहा तो मजेशीर क्षण!

ब्रायन लाराने वेस्ट इंडिजकडून १३३ कसोटी, २९९ वनडे खेळले. त्याने कसोटीत ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ११९५३ धावा केल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९ शतकांच्या मदतीने १०४०५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५३ शतके आणि २२३५८ धावा आहेत.

लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५०१ धावा केल्या आहेत. आपल्या काळातील मोठ्या खेळी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला लारा हा आक्रमक फलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ९ द्विशतके आहेत. यात दोन त्रिशतके आहेत. लाराने १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७५ आणि २००४ मध्ये ४०० धावा केल्या होत्या.