डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकणे आणि नंतप त्याला सनरायझर्स हैदराबादच्या प्लेईंग इलेव्हनमधून वगळणे, या दोन्ही घटना आयपीएल २०२१च्या सर्वात धक्कादायक घटनांपैकी एक आहेत. वॉर्नर हा हैदराबादच्या निष्ठावान खेळाडूंपैकी एक मानला जातो. अशा परिस्थितीत, सनरायझर्स हैदराबादचे त्याच्यासोबतचे असे वर्तन आता वॉर्नरच्या इतर संघांमध्ये सामील होण्याच्या चर्चांना बळ देताना दिसत आहे.

फॉक्सस्पोर्ट्स डॉट कॉमच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की आयपीएल २०२२ च्या आधी अनेक संघांनी वॉर्नरला आधीच संपर्क साधला आहे. असे मानले जाते की सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरशी केलेल्या वागणुकीमुळे इतर फ्रेंचायझींना धक्का बसला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ वॉर्नरला आपल्या संघात सामील करण्यास इच्छुक आहे. अहवालात पुढे म्हटले आहे, की रवी शास्त्रींनंतर टॉम मुडी यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्याची इच्छा आहे.

हेही वाचा – CSK vs DC : क्या बात..! मैदानात पाऊल ठेवताच गुरू-शिष्याच्या नावावर होणार ‘हे’ खास विक्रम!

वॉर्नरने शेअर केलेल्या एका पोस्टनुसार, तो फ्रेंचायझीला रामराम ठोकणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वॉर्नरने लिहिले, “आठवणींसाठी धन्यवाद. सर्व चाहत्यांसाठी, आमच्या संघासाठी तुम्ही शक्ती दिली. तुम्ही नेहमीच प्रेरणादायी बल आहात. हा एक अद्भुत प्रवास होता. मला आणि माझ्या कुटुंबाला नेहमीच तुमची आठवण येईल.”

आयपीएल यंदाचा हंगाम वॉर्नरसाठी अतिशय वाईट ठरला. त्याने ८ सामन्यांत २४.४७च्या सरासरीने फक्त १९५ धावा केल्या. २०१४ मध्ये हैदराबादमध्ये सामील झाल्यापासून, वॉर्नरने सध्याच्या मोहिमेपूर्वी प्रत्येक हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा वॉर्नर हा एकमेव खेळाडू आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादला २०१६ मध्ये पहिले आयपीएल जेतेपद मिळवून दिले.

Story img Loader