IPL 2022, GT vs RR Final Live : इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा १५वा हंगामाला नवीन विजेता मिळाला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून परावभ केला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिलची संयमी खेळीच्या बळावर गुजरातने आयपीएलचे विजेतपद आपल्या नावे केले आहे.अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने राजस्थानच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी न देता त्यांना १३० धावांवर रोखले होते. त्यामुळे आयपीएल २०२२ स्पर्धेचे विजेतपद मिळवण्यासाठी गुजरातला १३१ धावांचे माफक आव्हान मिळाले होते.
गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात आपला धावफलक शंभरी पार नेला आहे. गुजरातच्या संघाला आपला विजय दृष्टिक्षेपात दिसत आहे.
युजवेंद्र चहलने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केले आहे. यशस्वी जयस्वालने त्याचा झेल टीपला. पंड्याने ३० चेंडूमध्ये ३४ धावा केल्या.
https://platform.twitter.com/widgets.jsFinal. WICKET! 13.2: Hardik Pandya 34(30) ct Yashasvi Jaiswal b Yuzvendra Chahal, Gujarat Titans 86/3 https://t.co/8QjB0b5n7z #final #tataipl #ipl2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये गुजरात टायन्सचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. १० षटकांमध्ये गुजरातने दोन बाद ५४ धावांपर्यंत मजल मारली.
ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा मॅथ्यू वेड बाद झाला असून संघाची अवस्था दोन बाद २३ अशी झाली आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsFinal. WICKET! 4.3: Matthew Wade 8(10) ct Riyan Parag b Trent Boult, Gujarat Titans 23/2 https://t.co/8QjB0b5n7z #final #tataipl #ipl2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
गुजरात टायटन्सचा सलामीवीर वृद्धीमान साहा अवघ्या पाच धावा करून माघारी परतला आहे.
प्रसिद्ध कृष्णाने त्याला त्रिफळाचित केले.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचे सलामीवीर मैदानात उतरले आहे. शुभमन गील आणि वृद्धीमान साहा यांनी डावाची सुरुवात केली.
ट्रेंट बोल्टच्या रुपात राजस्थान रॉयल्सचा सातवा गडी बाद झाला आहे. साई किशोरच्या चेंडूवर राहुल तेवतियाने त्याचा झेल टिपला.
राजस्थान रॉयल्स संघाने आपले शतक पूर्ण केले आहे. पहिले सहा फलंदाज बाद झाल्यामुळे संजू सॅमसनचा संघ संकटात सापडला आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ संकटात सापडला आहे. राजस्थानच्या संघातील सर्व भरवशाचे फलंदाज माघारी परतले असून गुजरातच्या संघाने सामन्यावर मजबूत नियंत्रण मिळवले आहे. १५ षटकांमध्ये राजस्थानची अवस्था पाच बाद ९४ अशी झाली आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsFinal. WICKET! 14.6: Shimron Hetmyer 11(12) ct & b Hardik Pandya, Rajasthan Royals 94/5 https://t.co/8QjB0b5n7z #final #tataipl #ipl2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर बाद झाला आहे. टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला जोसला माघारी धाडले. हा राजस्थानच्या संघासाठी सर्वात मोठा झटका आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsFinal. WICKET! 12.1: Jos Buttler 39(35) ct Wriddhiman Saha b Hardik Pandya, Rajasthan Royals 79/4 https://t.co/8QjB0b5n7z #final #tataipl #ipl2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशीद खानने राजस्थानला तीसरा झटका दिला. देवदत्त पडिक्कल अवघ्या दोन धावा करून माघारी परतला.
अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात दहा षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने दोन गड्यांच्या बदल्यात ७१ धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला बाद केले आहे. साई किशोरने संजूचा झेल टिपला.
राजस्थान रॉयल्स संघाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. सध्या मैदानावर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन खेळत आहेत.
https://platform.twitter.com/widgets.jsFinal. 6.5: Lockie Ferguson to Jos Buttler 4 runs, Rajasthan Royals 53/1 https://t.co/8QjB0b5n7z #final #tataipl #ipl2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
पावरप्लेच्या सहा षटकांमध्ये राजस्थानने १ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने एक बाद ३७ धावा केल्या आहेत.
सलामीवीर यशस्वी जयस्वाल २२ धावा करून बाद झाला आहे. यश दयालने राजस्थानचा पहिला बळी मिळवला.
राजस्थान रॉयल्सच्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर मैदानात उतरले आहेत.
आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने अलझारी जोसेफच्या जागी लोकी फर्ग्युसनला संधी देण्यात आली आहे. तर, राजस्थान रॉयल्सने आपल्या संघामध्ये काहीही बदल केलेले नाहीत.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर, गुजरात टायटन्स गोलंदाजी करेल.
https://platform.twitter.com/widgets.jsFinal. Rajasthan Royals won the toss and elected to bat. https://t.co/8QjB0b5UX7 #final #tataipl #ipl2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
ए आर रहमान यांच्या जय हो या गाण्याने झाली समारोप सोहळ्याची सांगता. याच गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसला यशस्वी जयस्वाल
आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारदेखील आहे. तो सध्या समारोप सोहळ्याचा आनंद लुटतोय.
संगीतकार ए आर रहमान यांच्या वंदे मातरम् या गाण्याने संपूर्ण मैदानात देशभक्तिचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकादमी पुरस्कार विजेता संगीतकार ए आर रहमान यांच्या सुमधुर संगीताने अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. ए आर रहमान यांच्यासोबत गायिका नीती मोहन, मोहित चौहान आणि इतर गायक सादरीकरण करत आहेत.
आयपीएलच्या समारोप कार्यक्रमामध्ये रणवीर सिंगचे धमाकेदार नृत्यप्रदर्शन सुरू झाले आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२२ भव्य समारोप सोहळ्याला सुरुवात झाली आहे.