आयपीएल २०२२ च्या महालिलावाच्या दुसऱ्या दिवशी एक्सीलरेटेड बीडिंगदरम्यान कोलकाता नाइट रायटर्सने एका खास खेळाडूला संघात घेतलं. रमेश कुमार नावाच्या या खेळाडूला केकेआरने विकत घेतल्यानंतर लिलावामध्ये सहभागी झालेल्या इतर संघांच्या मालकांबरोबरच अनेकांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्हं दिसून आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिलावाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये केकेआरने रमेश कुमारला केकेआरने संघात स्थान दिलं. रमेश कुमारची बेस प्राइज २० लाख रुपये इतकी होती. केकेआर या एकमेव संघाने रमेशसाठी बोली लावली आणि त्याच किंमतीत त्याला संघात घेतलं.रमेश कुमार अद्याप एकही प्रोफेशनल क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. त्यामुळेच केकेआरने त्याच्यासाठी एवढे पैसे खर्च करण्याचा निर्णय अनेकांना गोंधळात टाकणारा ठरला. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट पाहणाऱ्यांना हे नाव नवं असलं तरी टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हे नाव फार परिचयाचं आहे.

रमेश कुमार हा मूळचा पंजाबचा असून तो टेनिस क्रिकेटमधील एक नावाजलेला खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये रमेश हा सुपरस्टार खेळाडू आहे. तिथे फक्त त्याला वेगळ्या नावाने ओळखलं जातं. नरेन जलालाबादिया नावाने टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारा रमेश हा सध्या या लिलावानंतर चांगलाच चर्चेत आहे.रमेशने या लिलावाआधी केकेआरसाठी ट्रायल दिलं होतं. यामध्ये त्याने दूरदूरपर्यंत फटकेबाजी करुन सर्वांचीच मने जिंकली होती.

ट्रायलमध्ये आपल्या फटकेबाजीचा प्रभाव पाडणारा रमेश हा चांगला गोलंदाजही आहे. मात्र तो टेनिस क्रिकेटमधील त्याच्या तुफान फलंदाजीसाठी चर्चेत असतो.रमेश अद्याप प्रोफेश्नल क्रिकेटचा एकही सामना खेळलेला नाही. मात्र असं असतानाही घरगुती स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंऐवजी केकेआरने रमेशला संघात घेण्यास प्राधान्य दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

रमेशने एका टेनिस बॉल स्पर्धेमध्ये १० चेंडूंमध्ये तब्बल ५० धावा ठोकल्या होत्या. केकेआरने २० लाखांना रमेशला विकत घेतल्यानंतर त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये रमेशच्या बॅटमधून केवळ षटकारांचा पाऊस पडताना दिसतोय.

केकेआरचा मालक असणाऱ्या शाहरुख खानच्या मुलांनी म्हणजेच आर्यन आणि सुहानाने रमेशवर टाकलेला विश्वास हा त्याच्या प्रोफेश्नल क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा असला तरी त्याला प्रत्यक्षात मैदानात उतरायला मिळणार की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.