नवीन आयपीएल फ्रेंचायझी लखनऊने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएलमध्ये गंभीर पहिल्यांदाच एखाद्या संघात मार्गदर्शक म्हणून सामील होणार आहे. अलीकडेच लखनऊने झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. क्रिकबझशी बोलताना, लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका म्हणाले, ”होय, आम्ही गौतम गंभीरला संघात मार्गदर्शक म्हणून सामील केले आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला दोनदा चॅम्पियन बनवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून आणि २०१४ मध्ये पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला होता. केकेआर व्यतिरिक्त गंभीर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारही होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याने १२९ सामने खेळले आणि ७१ सामने जिंकले.

हेही वाचा – IND vs SA : ठरलं बघा..! टीम इंडियाला मिळाला उपकप्तान; अजिंक्य रहाणे नव्हे, तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार जबाबदारी!

लखनऊचा संघ आरपी-संजीव गोयंका ग्रुपने ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतला आहे आणि ते पाच वर्षांनंतर लीगमध्ये परतत आहे. याआधी २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत गोयंका ग्रुपकडे रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा संघ होता. तर, सीव्हीसी कॅपिटलने ५,१६६ कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद संघ खरेदी केला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या विजयात गंभीरचा मोलाचा वाटा होता. २००७च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने अप्रतिम फलंदाजी केली होती. पाकिस्तानविरुद्ध गौतमच्या बॅटमधून ७५ धावा आल्या. त्याच्या खेळीमुळेच भारतीय संघाला सामन्यात दमदार पुनरागमन करता आले.

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सचिन आणि सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर गंभीरने डावाची धुरा सांभाळली. त्याने श्रीलंकेविरुद्ध ९७ धावा केल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 lucknow franchise appointed gautam gambhir as team mentor adn