आयपीएल २०२२पासून दोन नवीन संघ जोडले जाणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ आता लीगमध्ये सामील झाले आहेत. यापैकी आज लखनऊ फ्रेंचायझीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नवीन संघाचे नाव लखनऊ सुपर जायंट्स असेल, ज्याची मालकी आरपी संजीव गोयंका ग्रुपच्या मालकीची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनऊ फ्रेंचायझीने आपल्या चाहत्यांना नावे सुचवण्यास सांगितले होते. फ्रेंचायझीचे मालक डॉ. संजीव गोयंका यांनी एका व्हिडिओद्वारे संघाच्या नावाची घोषणा केली. ”नाव सुचवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नवीन नावाबाबत अनेक लाख लोकांनी सूचना दिल्या, ज्याच्या आधारे लखनऊ सुपर जायंट्स हे नाव निवडण्यात आले आहे”, असे गोयंका यांनी सांगितले.

हेही वाचा – IND vs SA : वनडे मालिका गमावल्यानंतर केएल राहुलची भावनिक पोस्ट; गर्लफ्रेंड अथिया शेट्टीनं केली ‘अशी’ कमेंट!

केएल राहुल लखनऊ फ्रेंचायझीचा कर्णधार असेल. १७ कोटी रुपयांच्या मोबदल्यात राहुलला संघात सामील केले गेले आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्जचे कर्णधारपद सांभाळत होता. राहुल हा आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळली. मात्र, मालिकेतील तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
याआधी गोयंका ग्रुपने २०१७ मध्ये पुणे फ्रेंचायझी विकत घेतली होती. या संघाचे नाव रायझिंग पुणे सुपरजायंट्स ठेवण्यात आले होते.