आयपीएल संघ पंजाब किंग्जने मयंक अग्रवालला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मयंकच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार आहे. मयंक अग्रवालच्या आधी लोकेश राहुल या संघाचा कर्णधार होता. अग्रवालने यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व केलेले नाही. मात्र, या मोसमात तो आधीच कर्णधार मानला जात होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेगा लिलावापूर्वी पंजाब संघाने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले होते. मयंक अग्रवाल हा पहिला खेळाडू होता ज्याला फ्रेंचायझीने रिटेन केले होते. त्याच्याशिवाय अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला कायम ठेवण्यात आले. यानंतर मयंकचे कर्णधारपद निश्चित असल्याचे मानले जात होते.

हेही वाचा – IND vs SL : कॅप्टन रोहितनं कोणाला दिली मालिकाविजयाची ट्रॉफी? जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल!

पंजाब किंग्ज संघाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. संघाचा कर्णधार बनल्यावर अग्रवाल म्हणाला, ”आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद मिळाल्याने खूप आनंद होत आहे. यावेळी मी पंजाबसाठी विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेन.” पंजाब संघाने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.

आयपीएल २०२मध्ये पंजाबला ब गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू आणि गुजरातसोबत प्रत्येकी दोन सामने खेळावे लागणार आहेत. त्याचबरोबर मुंबई, कोलकाता, राजस्थान आणि लखनऊविरुद्ध एक सामना खेळावा लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mayank agarwal replaces kl rahul as captain of punjab kings adn