इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल) स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. मात्र, बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होतील आणि ६० दिवसात ७४ सामने खेळवले जातील. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा गतविजेता आहे, तर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स ह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.

कधी, कुठे होणार लिलाव?

आयपीएलचा मेगा लिलाव गेल्या वर्षी कोविड-१९ महामारीच्या काळात पुढे ढकलण्यात आला होता आणि त्याची जागा मिनी लिलावाने घेतली होती. बहुप्रतिक्षित मेगा लिलाव आता १२ आणि १२ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. लिलावाचे वेळापत्रक भारतीय वेळेनुसार दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर मेगा लिलाव पाहता येणार आहे. बीसीसीआयने ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यामध्ये ३७० भारतीय तर २२० परदेशी खेळाडू आहेत.

आयपीएल २०२२ रिटेन्शन पॉलिसी

  • एकूण खेळाडूंची पर्स – ९० कोटी.
  • ४ खेळाडूंना कायम ठेवल्यास खेळाडूंच्या पर्समधून ४२ कोटी रुपये कापले जातील.
  • ३ खेळाडूंना रिटेन केल्याने ३३ कोटींची कपात होईल.
  • दोन खेळाडूंना कायम ठेवल्यास पर्समधून २४ कोटी रुपये कापले जातील.
  • त्याचबरोबर एका खेळाडूसाठी पर्समधून १४ कोटी रुपये कापले जातील.
  • बीसीसीआयच्या रिटेन्शन नियमांनुसार, ज्या खेळाडूला फ्रेंचायझी पहिल्या पसंतीवर कायम ठेवेल, त्याला १६ कोटी रुपये द्यावे लागतील. दुसऱ्या खेळाडूसाठी १२ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तिसऱ्या खेळाडूला ८ कोटी तर चौथ्या खेळाडूला ६ कोटी रुपये दिले जातील.

हेही वाचा – आरारा खतरनाक..! महेंद्रसिंह धोनीनं IPL 2022 पूर्वी हातात घेतलं पिस्तूल; पाहा VIDEO!

संघांकडे किती पैसे शिल्लक आहेत?

  • चेन्नई सुपर किंग्ज – ४८ कोटी रुपये
  • मुंबई इंडियन्स – ४८ कोटी रुपये
  • कोलकाता नाइट रायडर्स – ४८ कोटी रुपये
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ५७ कोटी रुपये
  • पंजाब किंग्ज – ७२ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स – ४७.५० कोटी रुपये
  • राजस्थान रॉयल्स – ६२ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद – ६८ कोटी रुपये

Story img Loader