आयपीएल २०२२ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. म्हणजेच निवडक खेळाडू वगळता सर्वांना लिलावात उतरावे लागणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघात रिटेन करणार असलल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ”चेन्नईने माझ्यावर पैसा वाया घालवू नये”, असे धोनीने म्हटले आहे. सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी हा खुलासा केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल २०२१चे विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत चारही जेतेपदे जिंकली आहेत.
Editorji या वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीनिवासन म्हणाले, ‘धोनी एक निष्पक्ष व्यक्ती आहे. त्याला कायम ठेवण्यासाठी संघाने जास्त पैसा खर्च करावा असे त्याला वाटत नाही. यामुळे संघाने रिटेन करावे, असे त्याला वाटत नाही. पण, पुढच्या सत्रातही धोनीने आमच्या संघातून खेळावे अशी माझी इच्छा आहे”, असे श्रीनिवासन म्हणाले.
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चालू मोसमात विजेतेपद पटकावले असले तरी त्याला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने १६ सामन्यात ११४ धावा केल्या. नाबाद १८ धावा ही सर्वात मोठी खेळी होती. धोनी सध्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाशी मेंटॉर म्हणून जोडला गेला आहे.
हेही वाचा – T20 WC : हाउ इज द JOS! श्रीलंकेला हैराण करत बटलरचं वादळी शतक; शेवटच्या चेंडूवर…
आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ उतरतील. याशिवाय ६० ऐवजी ७४ सामने खेळवले जातील. मात्र, प्रत्येक संघ पूर्वीप्रमाणे केवळ १४-१४ सामने खेळणार आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये मेगा लिलाव होऊ शकतो. दोन नवीन संघांची भर पडल्याने ५० नवीन खेळाडूंना लीगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पाच वेळा तर सीएसकेने चार वेळा पटकावले आहे. लखनऊ आणि अहमदाबाद दोन नवीन संघ लीगशी जोडले गेले आहेत.