विराट कोहली पुन्हा एकदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद स्वीकारताना दिसू शकतो. आगामी हंगामात विराट संघाचे नेतृत्व करू शकतो. यापूर्वी श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल यांना आरसीबीचा कर्णधार बनवण्याची चर्चा होती. पण आरसीबीच्या अध्यक्षांनी विराटबाबत लक्ष्यवेधी विधान केले आहे.
आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, ”विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले. आम्ही त्याला कर्णधारपदी ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी विनंती करू. आयपीएल २०२२चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या वर्षी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.
हेही वाचा – IND vs WI : कॅप्टन इज बॅक..! रोहित शर्मानं पास केली फिटनेस टेस्ट; संघात करणार कमबॅक!
मिश्रा यांनी सांगितले, की जर विराट कोहली कर्णधारपदासाठी सहमत असेल तर तो आरसीबीचा कर्णधार असेल. अन्यथा लिलावाद्वारे कर्णधार शोधावा लागेल. विराट कोहलीने २०१३ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले होते. कोहलीने ८ हंगामात आरसीबीचे नेतृत्व केले. मात्र तो संघाला एकदाही ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या आयपीएलमध्ये एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला होता.