आयपीएल २०२३ साठी, २३ डिसेंबर (शुक्रवार) रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होत आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांसोबतच चाहते आणि क्रिकेटपटूही आयपीएलच्या या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजेपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाच खेळाडू सर्वात महागडे ठरले आहेत. ज्यामध्ये एका भारतीयाचा आणि चार विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी सगळेच संघ मैदानात उतरले होते. आयपीएल इतिहासातील आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मागे टाकत सर्वात मोठी बोली लागणारा तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्सने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. टाटा आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी बोली लागली.
ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीनसाठी करननंतर सगळे मागे लागले होते. ज्यामध्ये दिल्ली आणि मुंबई त्याच्यासाठी प्रयत्न करताना दिसले. अखेर मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. तसेच तो या लिलावातील दुसरा सर्वात महाग खेळाडू ठरला.
इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आपला मागील आयपीएलमधील विक्रम मोडणार का? अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. तो अपेक्षाप्रमाणे भाव खाऊ शकला नाही. त्याला धोनीच्या चेन्नईने १६.२५ कोटीला खरेदी केले. मागच्या वेळी त्याने १५ कोटीच्या आसपास कमावले होते. तो यंदाच्या लिलावातील तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे.
इंग्लंडचा हॅरि ब्रूकसाठी सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये चढाओढ सुरु होती. तो १३.२५ कोटी रुपयांना विकला केला. त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील केले. हॅरि आतापर्यंतच्या लिलावातील चौथा महागडा खेळाडू ठरला आहे.
भारताचा युवा फलंदाज आणि पंजाबचा माजी कर्णधार मयंक अग्रवालसाठी सर्वच संघ शर्यतीत उतरले होते. सर्वांना आश्चर्यचकित करत ब्रूक आणि अग्रवालवर सर्वात जास्त लागली बोली. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात यासाठी रस्सीखेच झाली. ८.२५ कोटी रुपयात मयंकला खरेदी करत हैदराबादने दुसरी बोली जिंकली. अशाप्रकारे मयंक पाचवा महागडा खेळाडू ठरला आहे.