आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २३ डिसेंबर रोजी कोची येथे मिनी लिलाव होणार आहे. या लिलावात एकूण ४०३ खेळाडू रिंगणात असतील. मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद हा असाच एक संघ असेल. सर्वात जास्त पैसा कोणाकडे असेल. त्यांनी यावर्षी त्यांच्या प्रमुख खेळाडूंना सोडले आहे. या यादीत केन विलियम्सनचाही समावेश आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणला वाटते की, हैदराबादचा कर्णधार म्हणून मयंक अग्रवालकडे लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. २३ डिसेंबरला सर्व फ्रँचायझी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीला एक सल्ला दिला आहे. इरफान पठाण स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनमध्ये एका संभाषणात म्हणाला, “सनराईजर्स हैदराबादला मयंक अग्रवालसोबत जायला आवडेल. कारण त्यांना आक्रमक फलंदाजाची गरज आहे. त्यांच्याकडे केन विल्यमसन नाही. जो अनुभवी खेळाडू म्हणून इतके वर्ष त्याचे नेतृत्व करत आहे. मयंक अग्रवाल एका बाजूचे नेतृत्व करतो. तो असा खेळाडू आहे जो निर्भयपणे खेळतो. तो त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करत असावा.”

गेल्या मोसमात मयंक फ्लॉप ठरला होता

गेल्या आयपीएलमध्ये मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचा कर्णधार होता. कर्णधार म्हणून तो विशेष काही करू शकला नाही. त्याचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. गेल्या मोसमात मयंकची बॅटही पूर्णपणे नि:शब्द झाली होती. अशा स्थितीत पंजाब किंग्जने त्याला सोडले होते. जरी आयपीएल २०२२ पूर्वी मयंकने पंजाबसाठी अनेक संस्मरणीय आणि अतुलनीय खेळी खेळल्या आहेत.

SRH लिलावात नवीन कर्णधार शोधेल

येथे सनरायझर्स हैदराबादने केन विलियम्सनला सोडले. सनरायझर्सने गेल्या आयपीएलसाठी विलियम्सनला १४ कोटींना रिटेन केले होते. सनरायझर्स संघही गेल्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. विल्यमसनला सोडून सनरायझर्सकडे लिलावाच्या पर्समध्ये भरपूर पैसे आहेत, जेणेकरून ते त्यांच्या पुढील कर्णधाराच्या शोधात गुंतवणूक करू शकतील. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२ कोटींची रक्कम आहे.

हेही वाचा: Flashback 2022: धक्कादायक एक्झिट! ‘या’ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप

रिलीज केलेले खेळाडू – केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद

परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा – ४ कायम राखलेले खेळाडू – अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 auction sunrisers to bet on this indian player for captaincy irfan pathan suggests kavya maran avw
Show comments