टी२० विश्वचषक २०२२ चे बाद फेरीचे सामने सुरु होत आहेत. बुधवारी पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तर गुरुवारी दुसरा उपांत्य सामना भारत-इंग्लंड यांच्यात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टी२० विश्वचषकाकडे आहेत, पण त्याच दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठीची खलबतेही तीव्र होत आहेत. स्पोर्ट्स स्टारच्या मते, आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. त्याच वेळी, ही ग्रँड लीग मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. जगातील अनेक देशांचे स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसत आहेत.
या आयपीएल लिलावासाठी सर्व फ्रँचायझींच्या मालकांनी रक्कम ही वाढवल्या जाऊ लागल्या आहेत. वास्तविक, सर्व संघांचे एकूण बजेट ९० कोटींवरून ९५ कोटींपर्यंत वाढू शकते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आयपीएलसाठी मेगा लिलाव झाला होता, त्यावेळी सर्व संघांनी एकूण २०४ खेळाडूंना खरेदी केले होते. आयपीएल २०२२ प्रमाणेच आयपीएल २०२३ मध्ये एकूण १० संघ खेळतील. आता १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक संघाला ते त्यांच्या संघातून कोणते खेळाडू सोडत आहेत याची माहिती द्यावी लागेल. जे खेळाडू सोडले जातील त्यांना लिलावात जाण्याची संधी मिळणार आहे.
कोणती मोठी नावे लिलावात जाऊ शकतात?
सध्या कोणत्याही संघाने रिटेन्शन लिस्ट जाहीर केलेली नाही, ज्याच्या आधारे कोणते खेळाडू सोडले जातील याचा निर्णय घेतला जाईल म्हणजेच कोणाला लिलावात जावे लागेल. जर या अहवालांवर विश्वास ठेवला तर, यावेळी संघांकडून अनेक मोठी नावे जाहीर केली जाऊ शकतात. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा केरॉन पोलार्ड, गुजरात टायटन्सचा मॅथ्यू वेड, दिल्ली कॅपिटल्सचा शार्दुल ठाकूर, राजस्थान रॉयल्सचा नवदीप सैनी, पंजाब किंग्जचा मयांक अग्रवाल, शाहरुख खान आणि कोलकाता नाईट रायडर्सचा शिवम मावी, व्यंकटेश अय्यर या खेळाडूंचा समावेश आहे.
यावर्षीचा लिलाव हा मिनी असणार आहे, कारण गेल्या वर्षी एक मेगा लिलाव झाला होता ज्यामध्ये अनेक बदल दिसून आले होते. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज असताना आयपीएलची ही लिलावाची घोषणा खेळाडू आणि चाहत्यांना आणखी उत्साहित करेन यात काही शंका नाही.