आयपीएल २०२३ सुरु होण्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळताना दिसणार आहेत. बीसीसीआयने सर्व संघांना याबाबत सांगितले आहे. या अगोदर जर वर्षी परदेश खेळाडू आपल्या देशाच्या मालिका खेळण्यासाठी, आयपीएलचा हंगाम अर्धवट सोडून जायचे. तसेच लिलाव सुरु होण्यापूर्वीच ही बातमी मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका जूनच्या मध्यापासून सुरू होणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएल दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाहीत. यामुळे, दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएल (IPL 2023) च्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध होणार आहेत.
आयपीएल २०२३ साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी म्हणजेच आज कोची येथे होणार आहे. या लिलावासाठी ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्व १० संघ ८७ स्लॉटसाठी खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२३ च्या लिलावापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने एक मोठी भविष्यवाणी केली आहे की, यावेळी बेन स्टोक्सला आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळणार आहे. इऑन मॉर्गनचे म्हणणे आहे की, स्टोक्सकडे केवळ नेतृत्व कौशल्य नाही तर त्याच्याकडे प्रचंड दबावाखाली खेळण्याचा अनुभवही आहे. यामुळे बेन स्टोक्सवर पैशांचा पाऊस पडू शकतो.
आयपीएल लिलावात एकूण १० संघ असतील, ज्यांच्याकडे खेळाडूंची संख्या निश्चित आहे, ते लिलावात किती पैसे खर्च करू शकतात. सध्या सर्वाधिक रक्कम सनरायझर्स हैदराबादकडे आहे, तर सर्वात कमी रक्कम कोलकाता नाइट रायडर्सच्या शिल्लक पर्समध्ये आहे.
आयपीएल लिलाव कुठे पाहू शकता?
कोची येथे दुपारी २:३० वाजता आयपीएलचा लिलाव सुरू होईल. आयपीएलचा हा १६वा मिनी लिलाव आहे आणि एकूण ११वा आहे. हा लिलाव भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. जिओ सिनेमा अॅप आणि त्याच्या वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.