आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरंल. आयपीएलच्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली. सध्या रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा एका फोटोमुळे चर्चेत आला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर ऋतुराजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार बसली आहे. “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले होते.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

ऋतुराजने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक क्रिकेटपटूंसह त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक जण त्याला लग्नापूर्वी शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र या सर्व कमेंटमध्ये ऋतुराजच्या पत्नीच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.

utkarsha comment
उत्कर्षा कमेंट

आणखी वाचा : एका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…

ऋतुराजने शेअर केलेल्या या खास फोटोवर उत्कर्षाने कमेंट केली आहे. तिने हार्ट आणि नजर न लागण्याचे दोन इमोजी शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या कमेंटवर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यावर वहिनी अशी कमेंट केली आहे.

Story img Loader