जगातील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यासाठी अवघे काही महिने बाकी आहेत. आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या सर्व १० संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सादर केली आहे. तसेच सद्या कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२३ या फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक चाहता धोनीच्या नावाची जर्सी घालून ब्राझीलचा सामना पाहिला गेला होता. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या धोनीचे जगभरात चाहते आहेत. दरम्यान, कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या ब्राझील संघाच्या फुटबॉल सामन्यादरम्यान एका चाहत्याने सीएसके कर्णधार धोनीच्या नावाची आणि नंबरची जर्सी घातलेला दिसला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की “आपण जिथे जातो तिथे सर्वत्र पिवळेच असते.”
चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२३ नंतर निवृत्त होण्याची शक्यता. धोनीनंतर संघाला चांगल्या कर्णधाराची गरज आहे. एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेला चार वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. गेल्या मोसमात संघाने भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे संघाची कमान सोपवली होती. पण जडेजा त्याच्या नेतृत्वाखाली विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. त्यानंतर धोनीने पुन्हा संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
यावेळी मिनी लिलावापूर्वी केन विल्यमसन आणि ड्वेन ब्राव्हो सारखी अनेक मोठी नावे समोर आली, ज्यांना संघांनी करार मुक्त केले आहे. दरम्यान, धोनीनंतर कर्णधारपदासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या नजरा यावेळी मिनी लिलावाकडे आहेत. संघ त्यांच्या क्रमवारीत उत्कृष्ट खेळाडू जोडू शकतो. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्यावर संघाची नजर असेल. या दोन्ही खेळाडूंना आपापल्या संघातून मुक्त करण्यात आले आहे. मिनी लिलावात या दोन्ही खेळाडूंना मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.