IPL 2023 Dhoni Arijit Moment: ३१ मार्चला १६ व्या इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात अनेक कलाकारांची उपस्थिती होती. २०२३ च्या आयपीएलमधील पहिला सामना एम एस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स यांच्यात झाला. हाय व्होल्टेज सामन्याच्या आधी उद्घाटन कार्यक्रमातही अनेक कलाकारांनी चार चांद लावले होते. तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अरिजित सिंहने सुद्धा सादरीकरण केले. या कार्य्रक्रमाच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी कलाकारांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याच भेटीतील धोनी व अरिजित यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. जेव्हा धोनी अरिजितला भेटायला गेला तेव्हाअरिजित चक्क धोनीच्या पाया पडल्याचे दिसत आहे. धोनीनेही अरिजितला मिठी मारली आणि त्या क्षणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

अरिजित सिंह चक्क धोनीच्या पाया पडला

दुसरीकडे, सामन्यात मात्र धोनीची चांगलीच निराशा झाली. गुजरातचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला प्रथम फलंदाजी देण्यात आली. पॉवरप्लेमध्ये चेन्नईला मोठा धक्का बसला कारण त्यांनी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे स्वस्तात गमावला. मात्र, रुतुराज गायकवाडने धावांचा ओघ सुरू ठेवल्याने पाहुण्या संघाला पहिल्या सहा षटकांत ५१ धावा करता आल्या.

दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या विजयासह गुजरातने चेन्नईविरुद्धची आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली. सीएसकेवरचा हा त्याचा सलग तिसरा विजय आहे. आजवर गुजरातचा पराभव झालेला नाही. राशिद खानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.