आयपीएल २०२३मध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला आहे आणि या संघाला गुणतालिकेत ५व्या स्थानवर समाधान मानावे लागले आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे या संघाचे स्वप्न यावेळीही भंगले. आरसीबी एक मजबूत संघ होता आणि १४ सामन्यांपैकी त्यांनी ७ जिंकले होते आणि तेवढेच सामने गमावले होते. या मोसमात राजस्थानचा शेवटचा सामना पंजाब किंग्जसोबत झाला होता आणि त्यात संजूचा संघ ४ विकेट्सने पराभूत झाला आणि संघाला प्लेऑफमधून बाहेर पडून त्याची किंमत चुकवावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पुढील महिन्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. पण त्याआधी भारतीय आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर. अश्विनने पाठीच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत. वास्तविक, राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२३च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याच वेळी, संघाने आपला शेवटचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर खेळला. यादरम्यान अश्विन दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला होता. आता अश्विनने त्याच्या दुखापतीबाबत एक मोठा अपडेट दिला आहे.

हेही वाचा: IPL2023: “डेल स्टेनची साथ मिळाल्यानंतरही…” उमरान मलिकची खराब गोलंदाजी पाहून माजी विस्फोटक खेळाडू सेहवाग संतापला

राजस्थान संघाने आपला शेवटचा साखळी सामना पंजाबविरुद्ध १९मे रोजी धरमशाला येथे खेळला आणि या सामन्यात स्टार आणि सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन दुखापतग्रस्त झाला. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी संघाचा कर्णधार संजू सॅमसनने सांगितले होते की, “अश्विनला पाठदुखीमुळे या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.” आता आर अश्विनने स्वत: खुलासा केला की त्याला पाठदुखीची समस्या का होती.

आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “मला मऊ गादीवर झोपल्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो तर मी नेहमी जमिनीवर झोपतो.” तो पुढे म्हणाला की, “मी नेहमी जमिनीवर झोपतो, पण धरमशालात मी पलंगावर झोपलो. त्यामुळे मला पाठदुखीचा त्रास झाला आणि सर्व शरीर जड पडले होते.” यानंतर तो म्हणाला की, “आता मी घरी आलो आहे आणि माझी ही पाठदुखीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.”

हेही वाचा: IPL2023: “मी रिटायरमेंट मागे घेत आहे…” विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर ख्रिस गेलचे आश्चर्यचकित विधान

आर. अश्विनने या आयपीएल मोसमात राजस्थानसाठी १३ सामने खेळले असून त्यात त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. या मोसमात त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २३ धावांत २ बळी. त्याचवेळी आर. अश्विन भारतासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी मंगळवारी लंडनला रवाना होईल. टीम इंडियाला लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ जून ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 i am getting old ravichandran ashwin gave a big update on his backpain injury before wtc final avw