आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावात संघ कोणत्या खेळाडूंना खरेदी करणार आहेत, यावर आधीच अंदाज लावले जात आहेत. त्याचबरोबर या लिलावात मोठ्या नावांचा समावेश करून आपला संघ मजबूत करण्याकडे सर्व संघांचे लक्ष असणार आहे. पण या सगळ्यामध्ये एक बातमी समोर येत आहे की, प्रत्येक संघ इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सवर मोठी बोली लावण्याच्या तयारीत आहेत. याचा खुलासा भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला वाटते की, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला आयपीएलमध्ये जास्त मागणी असेल. त्याच्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीकडून सर्वाधिक मागणी असेल. आश्विन म्हणाला, “लखनौ सुपर जायंट्स नक्कीच बेन स्टोक्ससाठी जाईल.” अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, ते त्याला विकत घेऊ शकले तरच ते इतर खेळाडूंसाठी जातील.

रविचंद्रन अश्विन पुढे म्हणाला, “मला दुसरा यष्टीरक्षक, स्फोटक डावखुरा फलंदाज वाटतो, मला माहित आहे की तो गेल्या वर्षी चांगला खेळला नाही. पण मला वाटते की, निकोलस पूरनला चांगली रक्कम मिळेल. त्याचे पुनर्विक्री मूल्य खरोखरच खूप जास्त असेल. सीएसके सुद्धा त्याला घेण्याचा प्रयत्न करु शकते. कारण सीएसकेच्या मार्की यादीतून सॅम कुरनसाठी जाईल. पण त्यांना तो मिळणार नाही. बेन स्टोक्सवरही ते ऑलआऊट होतील. तेही मिळणार नाही. ते कॅमेरून ग्रीनला देखील खरेदी करण्याचा प्रयत्न करतील.”

हेही वाचा – आयसीसी अंडर-१९ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; टीम इंडियाची कमान शेफाली वर्माच्या हाती

अश्विनला असेही वाटते की, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स निकोलस पूरनच्या रूपात दुसऱ्या विकेट-कीपिंग पर्यायासाठी बोली लावू शकेल. अनुभवी ऑफ-ब्रेक गोलंदाजाच्या मते, जर ते सॅम कुरन, बेन स्टोक्स किंवा कॅमेरॉन ग्रीनसारखे अष्टपैलू खेळाडू खरेदी करू शकले नाहीत, तर असे होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 mini auction lucknow super giants to bid big for ben stokes predicts r ashwin vbm