IPL Mini Auction 2023 Players List: आज आयपीएल (IPL Auction 2023) साठी मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत कोची येथे होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. बीसीसीआय सर्व १० संघांसह ६७ रिक्त स्‍लॉट भरण्यासाठी हा मिनी लिलाव करणार आहे. लिलाव दुपारी २:३० वाजल्यापासून सुरू होईल, जो रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. यावेळी बीसीसीआयने लिलावासाठी विशेष टाय-ब्रेकर नियम (IPL Tie-Breaker Rules) लागू केला आहे. हा टायब्रेकरचा नियम काय असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल. चला जाणून घेऊया हा काय नियम आहे.

काय आहे टायब्रेकरचा नियम?

२०१० मध्ये पहिल्यांदा टायब्रेकरचा नियम आला, जो मिनी लिलावासाठी लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत, जर एखाद्या संघाला एखादा खेळाडू विकत घ्यायचा असेल आणि त्याच्या पर्सचे पैसे संपेपर्यंत त्या खेळाडूसाठी बोली लावत राहिल्यास, टाय ब्रेकरचा नियम लागू होतो. याअंतर्गत संघांना त्या खेळाडूसाठी गुप्त बोली लिखित स्वरूपात द्यावी लागते. ज्या संघाची बोली जास्त असेल, तो खेळाडू त्या संघाचा बनतो.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट

खेळाडूला मिळत नाही लाभ –

अशा परिस्थितीत, त्या खेळाडूला संघाच्या पर्समध्ये जितके पैसे आहेत तितकेच पैसे मिळतात. त्याच्यासाठी लावलेल्या बोलीची अतिरिक्त रक्कम बीसीसीआयच्या खात्यात जाते. टाय ब्रेकर बिड अंतर्गत रकमेची कोणतीही निश्चित मर्यादा नाही. टायब्रेकरची बोलीही समसमान झाल्यास पुन्हा तीच प्रक्रिया अवलंबली जाईल.

हेही वाचा – IPL Mini Auction 2023: लिलावापूर्वी ‘या’ स्टार खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय; सोळाव्या हंगामाच्या लिलावातून घेतली माघार

बीसीसीआयसाठी फायदेशीर करार –

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्स वेबसाइटला सांगितले की, “टाय ब्रेकर अंतर्गत, एका फ्रँचायझीला विचारले जाते की, ते या खेळाडूसाठी किती रक्कम द्यायला तयार आहेत. फ्रँचायझी बीसीसीआयला कागदावर लिहून कितीही रक्कम देते, ती बोली टायमुळे अतिरिक्त रक्कम असते. ही रक्कम बीसीसीआयच्या खात्यात जाते. बीसीसीआय त्यांना त्यांच्या पर्समधील अतिरिक्त रक्कम खर्च करण्याची संधी देते. फ्रँचायझी टाय ब्रेक बिडमध्ये कितीही रकमेची बोली लावू शकते. त्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.”

हेही वाचा – IPL 2023 Auction: आज खेळाडूंचा लिलाव; जाणून घ्या मिनी लिलावापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे

किती खेळाडूंवर बोली लावली जाईल?

यावेळी मिनी लिलावात ४०५ खेळाडू उतरणार आहेत. ४०५ क्रिकेटपटूंपैकी २७३ भारतीय खेळाडू आहेत, तर १३२ परदेशी खेळाडू आहेत. १३२ परदेशी खेळाडूंपैकी ४ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. एकूण ११९ कॅप्ड आणि २८२ अनकॅप्ड खेळाडू लिलावात सहभागी होतील. सर्व संघ एकूण ८७ खेळाडू खरेदी करू शकतात, ज्यामध्ये जास्तीत जास्त ३० परदेशी खेळाडू असतील

Story img Loader