इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखले जाते. या मुंबई इंडियन्स संघाबद्दल आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. अनुभवी अरुणकुमार जगदीश यांची नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने ट्विट करुन माहिती दिली आहे. जगदीश यांना १६ वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याव्यतिरिक्त कोचिंगचा मोठा अनुभव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुणकुमार जगदीश यांना त्यांच्या काळात उजव्या हाताचा एक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. त्यांना १०० पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. त्यांनी १९९३ ते २००८ पर्यंत म्हणजे १६ वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. निवृत्तीनंतर, ते कोचिंगकडे वळले आणि कर्नाटक संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनले.

त्यांनी २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये रणजी ट्रॉफी, इराणी चषक आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक विजेतेपद मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. २०१९-२० हंगामासाठी पुद्दुचेरीचे मुख्य प्रशिक्षक आणि २०२० पासून युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे.

हेही वाचा – अर्जेंटिनाच्या महिलेने शेअर केला मेस्सीसोबतचा भावनिक किस्सा; म्हणाली, ‘लिओनेलने माझ्या मुलाला…’

मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण गेल्या वर्षी त्यांच्यासाठी वाईट स्वप्न ठरले. संघाने १४ पैकी फक्त चार सामने जिंकले आणि ८ गुणांसह शेवटच्या स्थानावर असलेल्या आपल्या अभियानाचा शेवट केला. अलीकडेच, मुंबईने मिनी-लिलावात कॅमेरून ग्रीनला १७.५० कोटी रुपयांना विकत घेऊन त्यांच्या भावी रणनीतीची झलक दिली आहे.