इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील टप्प्यात एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत संघाला नाणेफेक दरम्यान त्यांच्या शेवटच्या ११ खेळाडूंसह प्रभावशाली खेळाडू बनू शकतील अशा चार खेळाडूंची नावे द्यावी लागतील. बीसीसीआयने आयपीएल २०२३ च्या सबस्टिट्यूट फील्डरच्या या खेळाडूबद्दल अधिकृत माहिती दिली होती. परंतु त्याच्या नियमांबद्दल अधिक स्पष्टीकरण दिलेले नव्हते. दरम्यान आता एक नवीन अपडेट समोर आली आहे, त्यात कोणत्याही परदेशी खेळाडूचा समावेश करता येणार नाही. या नियमाविषयी अधिक जाणून घेऊया.

याआधी देशांतर्गत स्तरावर लागू करण्यात आलेला असला तरी प्रथमच आयपीएलमध्ये प्रभावशाली खेळाडू नियम लागू करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बिग बॅश लीगमध्येही त्याची अंमलबजावणी झाली. हा नियम त्या लीगमध्ये खूप महत्त्वाचा ठरला, प्रभावशाली खेळाडूने (इम्पॅक्ट प्लेअर) अनेक सामन्यांना कलाटणी दिली. हा नियम आयपीएलमध्येही महत्त्वाचा ठरणार आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण दरम्यान आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
IND vs AUS Australia squad announced for 3rd 4th test Sam Konstas and Jhye Richardson Added in Team
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघात मेलबर्न-सिडनी कसोटीसाठी दोन मोठे बदल, १९ वर्षीय खेळाडूला दिली संधी
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
Rajat Patidar Protest 3rd Umpire Blunder Then Re reversed The Decision and Third Umpire Apologises
SMAT 2024: रजत पाटीदार तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर वैतागला, मैदान सोडण्यास दिला नकार; माफी मागत पंचांनी बदलला निर्णय
suryansh shedge
Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेची निर्णायक खेळी; सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई ‘अजिंक्य’
Pakistan Bowler Mohammed Irfan Announced Retirement From International Cricketer Third Player to Retire in past 3 days
३ दिवसांत पाकिस्तानच्या तीन खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती, भारताविरूद्ध पदार्पण करणाऱ्या ‘या’ गोलंदाजाने क्रिकेटला केलं अलविदा

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना सांगितले आहे की, कोणत्याही परदेशी खेळाडूला प्रभावशाली खेळाडू बनवता येणार नाही. याचा अर्थ जेव्हा कर्णधार प्लेइंग इलेव्हनसोबत ४ पर्यायी खेळाडूंची नावे घेतो, तेव्हा ते सर्व भारतीय असले पाहिजेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडू खेळू शकतात. या नियमात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच भारतीय खेळाडूच्या जागी परदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊ शकत नाही. तसेच परदेशी खेळाडूच्या जागी सब्स्टीट्यूट खेळाडू म्हणून खेळू शकत नाही.

आणखी वाचा – Flashback 2022: भारतीय पुरुष क्रिकेटमध्ये आयपीएल पासून ते टी२० विश्वचषक या क्रीडा स्पर्धांची पाहायला मिळाली क्रेझ

प्रभावशाली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) नियम कधी, कसा लागू होईल?

१- प्रभावशाली खेळाडू नियमांतर्गत, कर्णधार नाणेफेक दरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट नसलेल्या खेळाडूला (भारतीय) बाहेरून खेळवण्यास सक्षम असतील. तो इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूच्या जागी खेळू शकेल. तो प्रभावशाली खेळाडू म्हणून ओळखला जाईल.

२- कर्णधाराला नाणेफेकीदरम्यान खेळणाऱ्या ११ खेळाडूंच्या नावासह अतिरिक्त ४ खेळाडूंची (भारतीय) नावे द्यावी लागतील. या ४ खेळाडूंपैकी कोणताही एक प्रभावशाली खेळाडू होऊ शकतो.

३- संघाला सामन्याच्या मध्यभागी त्याच्या प्रभावशाली खेळाडूला बोलावून त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करु देऊ शकतात.

४- यामध्ये काही नियम असले तरी, जसे की संघ डावाच्या १४व्या षटकानंतर प्रभावशाली खेळाडूला बोलावू शकत नाही. जर त्यांना बदल करायचे असतील तर ते त्यापूर्वी करू शकतात.

५- इम्पॅक्ट प्लेअरच्या बदल्यात वगळलेला खेळाडू संपूर्ण सामन्यात परत येऊ शकणार नाही. तो क्रिकेटमध्ये बदली क्षेत्ररक्षक म्हणूनही खेळू शकत नाही.

६- प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यापूर्वी कर्णधाराने ऑनफिल्ड अंपायर किंवा चौथ्या अंपायरला कळवावे लागेल.

हेही वाचा – IND vs BAN: “जबाबदार कोण? कर्णधार म्हणत…”; भारताच्या दिग्गज खेळाडूची रोहितच्या ‘अर्ध-फिट खेळाडू’ टिप्पणीवर टीका

७- कोणत्याही परिस्थितीत, सामना २० षटकांवरून १० षटकांचा केल्यास, प्रभावशाली खेळाडूचा नियम संपुष्टात येईल, म्हणजेच या परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Story img Loader