इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये २०२२ साली पार पडलेले पहिलेच असे पर्व ठरले ज्यामध्ये रोहित शर्माला एकही अर्धशतक झळखावता आलं नाही. हे पर्व मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला वैयक्तिक स्तरावर आणि कर्णधार म्हणूनही फार वाईट गेलं. मुंबईचा संघ साखळी फेरीनंतर बाहेर पडला. साखळी फेरीमधील दिल्ली कॅपीटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यामध्येही रोहित स्वस्तात परतला अन् त्याचा पर्वातील शेवटही गोड होईल ही चाहत्यांची अपेक्षा मावळली. शेवटच्या सामन्यात रोहितने १३ चेंडूंमध्ये दोन धावा केल्या. मात्र हा सामना मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच गडी राखून जिंकला. संघ म्हणून या सामन्यात विजय मिळून मुंबई इंडियन्सने शेवट गोड केला. मात्र संघ गुणतालिकेमध्ये तळाशी म्हणजे आठव्या स्थानी राहिला.

हिटमॅन नावाने लोकप्रिय असणाऱ्या रोहितला या पर्वामध्ये अवघ्या १९.१४ च्या सरासरीने १४ सामन्यांत २६८ धावा करता आल्या. त्याचा सर्वाधिक स्कोअर ४८ इतका राहिला. दरम्यान रोहित सध्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये असला तरी त्याने १३ ऑक्टोबर रोजी केलेल्या एका ट्वीटमुळे तो मुंबई इंडियन्सची साथ सोडणार की काय अशी शंका उपस्थित केली जात असल्याचं वृत्त ‘डीएनए’ने दिलं आहे. तर काहींनी या ट्वीटवरुन टी-२० विश्वचषकाआधी कर्णधाराने असं बोलणं हे आश्चर्याचा धक्का देणार आहे असं म्हटलं आहे.

Rohit Sharma was going to retire after the Melbourne Test but A well wisher forced to change of decision
Rohit Sharma : रोहित शर्मा मेलबर्न कसोटीनंतर घेणार होता निवृत्ती; कोणामुळे बदलला निर्णय? जाणून घ्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Rohit Sharma confirms he is not retiring in Test Cricket anytime soon during IND vs AUS 5th test day 2 Sydney
Rohit Sharma : ‘मी कुठेही जात नाही…’, रोहितने निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावत टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर
IND vs AUS You cannot drop your captain Mohammad Kaif slams after Rohit Sharma not playing Sydney Test
IND vs AUS : ‘विराट कोहलीही…’, रोहित शर्माच्या बाहेर होण्यावर माजी खेळाडू मोहम्मद कैफने व्यक्त केला संताप; म्हणाला, ‘कर्णधार म्हणून…’
Why Rohit Sharma Test Debut Delayed by 3 Years After Tragic Accident Read Story
Rohit Sharma: रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीची सुरूवातही अपघाताने अन् शेवटही, पदार्पण ३ वर्ष का गेलं होतं लांबणीवर? वाचा सविस्तर
IND vs AUS 5th Test Irfan Pathan reaction on Rohit Sharma after he opt to drop from Sydney match
IND vs AUS : ‘…हे स्वतः फलंदाजाला कळतं’, रोहित शर्माबद्दल इरफान पठाणचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडू…’
IND vs AUS Rohit Sharma has decided to rest himself for the Sydney Test and has made two changes to the Indian team
Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय! शेवटच्या कसोटीत स्वत: घेतली विश्रांती, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी

‘नवीन संघाची बांधणी करतोय’ असं ट्वीट रोहितने केलं आहे. “मी नवा संघ बांधतोय. कोणी आहे का?” असं रोहितने म्हटलं आहे. म्हणजेच मी नवीन संघ तयार करत आहे. कोणाकोणाला त्यामध्ये येण्याची इच्छा आहे अशा अर्थाचं हे ट्वीट असून त्यावर मागील १२ तासांमध्ये हजारोंच्या संख्येने रिप्लाय आले आहेत. हे ट्वीट साडेपाच हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आलेलं आहे.

मात्र विश्वचषकाआधी कर्णधाराच्या अकाऊंटवरुन असं ट्वीट आल्याने काहींनी थेट नाराजी व्यक्त करत महत्त्वाच्या मालिकेआधी कर्णधाराने नवा संघ उभारतोय असं म्हणणं चुकीचा संदेश देणार असल्याचं मत मांडलं आहे.


१)

२)

३)

४)

५)

दरम्यान दुसरीकडे अनेक क्रिकेटपटूंनी रोहितचं हे ट्वीट कोट करुन रीट्वीट केल्याने हे एखाद्या जाहिरातीचं कॅम्पेन असावं अशी शक्यताही चाहत्यांनी व्यक्त केलेली आहे. आता हा नेमका काय प्रकार आहे ते रोहितच्या पुढच्या ट्वीटनंतरच स्पष्ट होईल. २०११ पासून रोहित मुंबई इंडिन्स संघामधून खेळतोय. त्यापूर्वी तो डेक्कन चार्जर्स संघासाठी दोन पर्व खेळला आहे.

Story img Loader