टी-२० क्रिकेट चाहत्यांना आगामी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले आहेत. अशातच आज आयपीएलच्या सर्व १० संघांनी आपल्याकडे कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) आणि संघातून मुक्त (रिलीज) केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रिलीज केलेले खेळाडू आणि नवीन खेळाडूंसह जवळपास ५०० हून अधिक खेळाडूंचा लवकरच लिलाव होणार आहे. त्यानंतर सर्व संघ आयपीएल २०२४ साठी सज्ज होतील. दरम्यान, गुजरात टायटन्स या संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. गुजरातचा संघ पांड्याला संघातून मुक्त करणार असून तो आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्येदेखील गुजरातकडूनच खेळताना दिसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला रिलीज केलं आहे. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर या दोघांना एकत्र खेळवून प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवण्याचा मुंबईचा विचार होता पण दोघांनाही दुखापतींनी सतावल्यामुळे हा विचार कागदावरच राहिला. आर्चर दुखापतीमुळे दोन वर्ल्डकप खेळू शकलेला नाही. अखेर मुंबईने आर्चरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्चरसह मुंबईने ट्रिस्टन स्टब्स, झाय रिचर्डसन, हृतिक शोकीन, ड्युआन यान्सन, रायली मेरिडिथ, ख्रिस जॉर्डन यांनाही निरोप दिला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलेले खेळाडू

महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शाईक रशीद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हंगारगेकर, दीपक चहर, महेश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथीशा पथिराणा
रिलीज केलेले प्लेयर्स
बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरस, के. भगत वर्मा, शुभ्रांशू सेनापती, आकाश सिंग, कायले जेमिसन, सिसांदा मगाला

राजस्थान रॉयल्सने रिटेन केलेले खेळाडू

संजू सॅमसन, जोस बटलर, शिमोरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनाव्हन फरेरा, कुणाल राठोड, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अॅडम झंपा, अवेश खान
रिलीज केलेले खेळाडू
जो रुट, ओबेड मेकॉय, जेसन होल्डर, अब्दुल बसिथ, आकाश वसिष्ठ, कुलदीप यादा, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, के.एम.आसिफ

दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेले खेळाडू

ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धूल, प्रवीण दुबे, विकी ओत्सवाल, अँनरिक नॉर्किया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.
रिलीज केलेले खेळाडू
रायले रुसो, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्ताफिझूर रहमान, कमलेश नागरकोट्टी, रिपल पटेल, सर्फराझ खान, अमन खान, प्रियम गर्ग.

कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन केलेले खेळाडू

श्रेयस अय्यर, नितीश राणा, रहमनुल्ला गुरबाझ, जेसन रॉय, सुनील नरिन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
रिलीज केलेले खेळाडू
शकीब अल हसन, लिट्टन दास, आर्या देसाई, डेव्हिड व्हिसे, नारायण जगदीशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, जॉन्सन चार्ल्स.

सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू

एडन मारक्रम, अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, हेनरिच क्लासन, मयांक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्रसिंग यादव, नितीश कुमार रेड्डी, शाहबाझ अहमद, अभिषेक शर्मा, मार्को यान्सन, वॉशिंग्टन सुंदर, सन्वीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी.नटराजन, मयांक मार्कंडेय, उम्रान मलिक, फझलक फरुकी
रिलीज केलेले खेळाडू
हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विव्रांत शर्मा, अकेल हुसैन, आदिल रशीद.

लखनौ सुपरजायंट्सने रिटेन केलेले खेळाडू

के.एल.राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, के.गौतम, कृणाल पंड्या, काईल मेयर्स, मार्कस स्टॉइनस, प्रेरक मंकड, युधवीर सिंग, मार्क वूड, मयांक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, नवीन उल हक.
रिलीज केलेले खेळाडू
डॅनियल सॅम्स, करुण नायर, जयदेव उनाडकत, मनन व्होरा, करण शर्मा, श्रेयंश शेडगे, स्वप्नील सिंग, अर्पित गुलेरिया

पंजाब किंग्सने रिटेन केलेले खेळाडू

शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, लियम लिविंगस्टन, गुरनूर सिंह, शिवम सिंह, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, विद्वत कवेरप्पा, कगिसो रबाडा, नॅथन एलिस

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड (ट्रेड)
मुंबईने रिलीज केलेले खेळाडू
अरशद खान, रमनदीप सिंह, ऋतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यान्सन, झाय रिचडसन, रायली मेरिडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वारियर

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने रिटेन केलेले खेळाडू

फाफ डुप्लेसी, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, रीस टॉपली, विल जॅक्स, रजत पाटीदार, अनुज रावत, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, मनोज भांडगे, आकाश दीप, राजन कुमार चौधरी, विशाक विजयकुमार, हिमांशु शर्मा, कर्ण शर्मा, मयंक डागर (हैदराबादकून ट्रेड केलेला खेळाडू)
बँगलोरने रिलीज केलेले खेळाडू
जोश हेजलवूड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन अ‍ॅलन, मायकल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव

गुजरात टायटन्सने रिटेन केलेले खेळाडू

हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, राशिद खान, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियम्सन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, जॉशुआ लिटिल, मोहित शर्मा.
गुजरातने रिलीज केलेले खेळाडू
शिवम मावी, अल्जारी जोसेफ, दासून शानाका, प्रदीप सांगवान, यश दयाल, के.एस. भरत, उर्विल पटेल, ओडियन स्मिथ.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 all 10 teams retained players list csk mi rr dc rcb gt srh kkr pbks lsg asc