IPL 2024 Auction who will be present in Auction: आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. लिलावात एकूण ३३३ खेळाडू आपले नशीब आजमावतील. परदेशी खेळाडूंसाठी ३० स्लॉटसह एकूण ७७ जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत, सर्व दहा फ्रँचायझी खेळाडूंबाबत गृहपाठ पूर्ण करून टेबलवर येतील. काही फ्रँचायझींमध्ये काही स्टार खेळाडूंसाठी चुरशीची स्पर्धा होऊ शकते. ट्रॅविस हेड, रचिन रवींद्र आणि मिचेल स्टार्क यांसारखे काही मोठे स्टार लिलावात आपले नशीब आजमावतील. आम्ही तुम्हाला सर्व १० फ्रँचायझींचे मोठे चेहरे दाखवत आहोत, जे लिलावादरम्यान त्यांच्या संबंधित फ्रेंचायझी टेबलवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स: नीता अंबानी, आकाश अंबानी
मुंबई इंडियन्सचे मालक महत्वाच्या खेळाडूंना खरेदी केल्यानंतर नेहमी हसताना दिसतात. नीता अंबानी कधीही आयपीएल लिलावाचा दिवस चुकवत नाहीत आणि त्यांची उपस्थिती प्रत्येकाला त्यांच्या लक्ष्यावर केंद्रित ठेवते. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आकाश अंबानीही या लिलावात सहभागी होतो. दोघेही सहसा शांत असतात आणि संघ व्यवस्थापनाला निर्णय घेण्यास मदत करतात.
चेन्नई सुपर किंग्ज: कासी विश्वनाथन
कासी विश्वनाथन चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आहेत. लिलावादरम्यान ते नेहमी कानात इअरफोन घातलेले दिसतात आणि कोणाशी तरी चर्चा करताना दिसतात. सीएसकेने कोणता खेळाडू घ्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्यात काशी विश्वनाथनची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.
राजस्थान रॉयल्स: कुमार संगकारा
श्रीलंकेचा माजी महान खेळाडू २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा संचालक म्हणून जेव्हा संघात सामील झाला, तेव्हापासून त्याने दोन लिलावांमध्ये भाग घेतला आहे. संगकाराचा शांत स्वभाव आणि चाणाक्ष वृत्ती ही लिलावादरम्यानही दिसून येते. तो खूप शहाणपणाने निर्णय घेतो, असे दिसून येते. संगकारा हा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचे म्हटले जाते आणि यंदाच्या लिलावात खेळाडूंच्या निवडीतूनही हे दिसून येते.
गुजरात टायटन्स : आशिष नेहरा
गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा लिलावादरम्यानही अॅनिमेटेड मूडमध्ये असतो. तो इतर संघमालक आणि व्यवस्थापनाशी सतत बोलत राहतो. नेहराकडेही उत्कृष्ट क्रिकेटचे ज्ञान आहे आणि तो विचारपूर्वक खेळाडूंची निवड करतो. हा संघ गेल्या दोन वेळेस अंतिम फेरीत पोहोचला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: अँडी फ्लॉवर
झिम्बाब्वेचा हा महान खेळाडू गेल्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सच्या लिलावाच्या टेबलावर दिसला होता. मात्र, यावर्षी अँडी फ्लॉवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी लिलावाची रणनीती बनवताना दिसणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आरसीबीला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
लखनऊ सुपर जायंट्स: जस्टिन लँगर
ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर हे लखनऊ सुपर जायंट्सचे नवे प्रशिक्षक असतील. गेल्या वेळी, गौतम गंभीर देखील लखनऊच्या टेबलवर दिसला होता, जो या वर्षी दिसणार नाही. अशा स्थितीत लखनऊला लँगरवर खूप विश्वास ठेवावा लागणार आहे. या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी तो लिलावात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेताना दिसेल, अशी अपेक्षा आहे.
दिल्ली कॅपिटल्स: किरण कुमार गांधी
किरण कुमार गांधी, जे दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक आहेत, हे लिलावात त्यांच्या विशेष रणनीतीसाठी ओळखले जातात. ते लिलावात बरेच अनुभवी आहे आणि कोणत्या खेळाडूसाठी किती बोली लावायची हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच जरी दिल्ली कधीच चॅम्पियन झाली नसली तरी संघाला स्टार खेळाडूंची कमतरता भासली नाही.
कोलकाता नाइट रायडर्स: जान्हवी मेहता, गौतम गंभीर
जान्हवी मेहता ही लिलावाच्या बाबतीत केकेआर थिंक टँकची महत्त्वाची सदस्य आहे. केकेआर सह-मालक जय मेहता आणि जुही चावला यांची मुलगी जान्हवी तिच्या संघाला खरेदी करू इच्छित असलेल्या खेळाडूंच्या यादीसह तयार आहे. या वर्षी ती केकेआर सीईओ वेंकी म्हैसूर आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याबरोबर लिलावाच्या टेबलवर दिसू शकते. सुहाना खान आणि आर्यन खान उपस्थित राहणार की नाही, हे पाहणे बाकी आहे.
पंजाब किंग्स: प्रीती झिंटा
आयपीएल लिलावात प्रिती झिंटा नेहमीच उपस्थित असते. ती शेवटची आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये दिसली होती. जेव्हा पंजाब किंग्जच्या सहमालकाने तेव्हा दक्षिणेचा स्फोटक फलंदाज शाहरुख खानसाठी बोली लावली होती आणि त्यानंतर शाहरुखला विकत घेतल्यावर ती जोरजोरात हसायला लागली. यावेळीही प्रीती लिलावात आपले ग्लॅमर पसरवू शकते.
सनरायझर्स हैदराबाद: काव्या मारन
सनरायझर्स हैदराबादची मालक काव्या मारन प्रत्येक लिलावात उपस्थित असते. ती प्रत्येक वेळी चांगले खेळाडू विकत घेते, परंतु २०२० पासून तिचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. लिलावादरम्यान ती तिच्या मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाशी सतत चर्चा करताना दिसते की खेळाडूसाठी कधी बोली लावायची किंवा कधी थांबायचे. लिलावाच्या दिवशी तो दुबईत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काव्याला तिच्या ग्लॅमरने लिलावात मोहिनी घालताना पाहिले जाऊ शकते.