IPL 2024 Auction Preity Zinta: आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने नको असलेला खेळाडू विकत घेतला. या चुकीनंतर फ्रँचायझीने खेळाडूला परत करण्याची मागणी केली, मात्र लिलावकर्ता मल्लिका सागरने नकार दिला. मल्लिकाने पंजाब किंग्जला ऑक्शन हॉलमध्ये सांगितले की, खेळाडूचा लिलाव पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत निर्णय बदलता येत नाही. सहमालक प्रीती झिंटाच्या चुकीमुळे संघात नको असलेल्या खेळाडूचा प्रवेश झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशांक सिंगचे नाव समोर येताच प्रिती झिंटाने आपल्या संघातील खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर पॅडल उचलले. शशांक लवकरच विकला गेला कारण त्याच्यासाठी इतर फ्रेंचायझी बोली लावत नव्हते. तो २० लाखांच्या बेस प्राईसवर पंजाब किंग्ज संघात सामील झाला. जेव्हा लिलावकर्ता मल्लिका खेळाडूंच्या पुढच्या सेटमध्ये गेली, ज्यात पहिले नाव तनय थियागराजन होते, तेव्हा पंजाबला त्यांची चूक समजली.

हेही वाचा: IPL 2024 Auction: लिलावात चाहत्यांनी रोहितबद्दल प्रश्न विचारताच आकाश अंबानीने केले सूचक विधान; म्हणाला, “चिंता करू नका…”

काय म्हणाली मल्लिका सागर?

पंजाब किंग्जच्या टेबलावर बसलेल्या प्रीती झिंटा, नेस वाडिया आणि इतरांना समजले की त्यांनी शशांकला इतर कोणीतरी खेळाडू समजून पॅडल उचलले आणि चुकले. मल्लिकाने विचारले, “हे चुकीचे नाव होते का? तुम्हाला हा खेळाडू नको आहे का? मी शशांक सिंगबद्दल बोलत आहे. हातोडा खाली आला असल्याने लिलाव पूर्ण झाला आहे. २३६ आणि २३७ क्रमांकाचे दोन्ही खेळाडू तुमच्याकडे गेले आहेत.” वाडियाने या विक्रीवर नाराजी व्यक्त करताना दिसले पण मल्लिका आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि म्हणाली की, “हातोडा खाली आला आहे, त्यामुळे हा लिलाव पूर्ण झाला आहे.” पंजाब किंग्जला शशांक नको होता, पण त्याला त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करावे लागले. जर शशांकने हा लिलाव पाहिला असेल तर त्यालाच माहित आहे की तो कोणत्या परिस्थितीतून गेला होता. हे त्याच्यासाठी थोडं लाजिरवाणं होतं. एकप्रकारे हा शशांकचा प्रीतीने अपमान केला आहे.

फ्रँचायझींना खेळाडूंची यादी दिलेली असते

लिलाव कक्षात असलेल्या फ्रँचायझींकडे त्यांच्या लॅपटॉप स्क्रीनवर खेळाडूंची संपूर्ण यादी दिसत असते. लिलाव कक्षात पोहोचण्यापूर्वी सर्व फ्रँचायझी त्यांचे गृहपाठ करतात. त्यांना कोणते खेळाडू विकत घ्यावे लागतील याचे ते विश्लेषण करतात, ज्यामध्ये कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश असतो. नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि त्यांच्या टीमने लिलावाच्या टेबलवर चूक केली कारण त्यांनी छत्तीसगडचा खेळाडू शशांक सिंगला दुसऱ्यासाठी समजून घेतले. तो चूक सुधारू शकला तोपर्यंत तो खेळाडू विकला गेला होता.

हेही वाचा: IPL 2024 GT Full Squad: शाहरुख-अझमतुल्ला एकत्र मिळून हार्दिक पंड्याची जागा घेऊ शकतील का? जाणून घ्या

संघातील कायम खेळाडू: शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू: हर्षल पटेल (११.७५ कोटी), ख्रिस वोक्स (४.२० कोटी), आशुतोष शर्मा (२० लाख), विश्वनाथ प्रताप सिंग (२० लाख), शशांक सिंग (रु.२० लाख), तनय त्यागराजन (रु. २० लाख). प्रिन्स चौधरी (रु.२० लाख), रिले रुसो (८ कोटी).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 auction preity zinta made big mistake insulted this player in ipl auction know full case avw