IPL 2024 auction will be held on December 19 in Dubai: इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाचा (आयपीएल २०२४) लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, सर्व १० फ्रँचायझींना पाठवलेल्या संदेशात बीसीसीआयने असेही सांगितले की, कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम २६ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.

आगामी हंगाम हे खेळाडूंसाठी तीन वर्षांच्या कराराचे तिसरे आणि अंतिम वर्ष असेल. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षीचा लिलाव इस्तंबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता, परंतु हा विचार मागे घेतला होता. आयपीएलने शुक्रवारी जाहीर केले की २०२३ च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स सोबत असलेल्या वेस्ट इंडिजचा खेळाडू रोमॅरियो शेफर्डचा पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सोबत व्यवहार (ट्रेड) करण्यात आला आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या

ज्या दिवशी लिलाव होईल, त्या दिवशी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुसरा वनडे खेळण्यात व्यस्त असेल. आयपीएल संघांना कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ असेल. सर्व १० आयपीएल संघांच्या पर्समध्ये १०० कोटी रुपये असतील, जे गेल्या हंगामापेक्षा ५ कोटी रुपये जास्त आहेत.

हेही वाचा – NED vs AFG, World Cup 2023: अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, गुणतालिकेत पाकिस्तानला टाकले मागे

सध्या, पंजाब किंग्जकडे सर्वात जास्त शिल्लक रक्कम १२.२० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी शिल्लक रक्कम ०.०५ कोटी रुपये आहेत. याशिवाय सनरायझर्स हैदराबादकडे ६.५५ कोटी रुपये आहेत. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांकडे ४.४५ कोटी आहेत. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सकडे ३.५५ कोटी रुपये आहेत. राजस्थान रॉयल्सकडे ३.३५ कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे १.७५ कोटी रुपये आहेत. तसेच कोलकाता नाइट रायडर्सकडे १.६५ कोटी आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडे १.५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

हेही वाचा – World Cup 2023: वर्ल्ड कप आपला आहे ना? चाहत्यांच्या प्रश्नाला रोहित शर्माने दिलं ‘हे’ उत्तर; VIDEO होतोय व्हायरल

मिनी लिलाव एका दिवसात संपेल. मिनी लिलावामध्ये दर चार वर्षांनी एकदा होणाऱ्या दोन दिवसांच्या मेगा लिलावाच्या तुलनेत काही सर्वात महाग खरेदी झाली आहे. विशेषतः परदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. २०२३ च्या हंगामापूर्वी, इंग्लंडचा सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग्जने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये १८.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.