MS Dhoni on Chennai Super Kings: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सांभाळत नेतृत्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण दिले आहे. २०२३ साली चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपली शानदार खेळी करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२४ मध्ये चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करू इच्छितो. मात्र, त्याने लिलावापूर्वी खेळण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये खेळणार?

यावर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळणार का? याआधीही महेंद्रसिंग धोनीच्या जगभरातील चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होत होता. महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२४ खेळण्यासाठी योग्य आहे का? त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी महेंद्रसिंग धोनीबाबत चर्चा करत सूचक भाष्य केले आहे. ते म्हणाला की, “महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आयपीएल २०२४ खेळण्यासाठी तयार आहे.” यावर धोनीने म्हटले आहे की, “मी सध्या माझ्या तंदुरुस्तीवर लक्ष्य केंद्रित करत आहे. माझी गुडघ्याची दुखापत सध्या बरी असून मी जिममध्ये घाम गाळत आहे.” सीएसकेचे सीईओ म्हणाले, “ही मोठी बाब आहे.”

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
MS Dhoni Seven Rupee Coin Fake News
MS Dhoni Coin : एमएस धोनीच्या सन्मानार्थ सरकार सात रुपयांचे नाणे आणत आहे? काय आहे सत्य? जाणून घ्या
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

हेही वाचा: Rahul Dravid Coach: राहुल द्रविडला टीम इंडियाचा पुन्हा प्रशिक्षक करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांच्या मते, धोनी आयपीएलचा संपूर्ण आगामी हंगाम खेळणार आहे. त्याने स्वतः आयपीएल २०२३च्या शेवटी पुष्टी केली होती की, त्याला पुढील वर्षी आयपीएल खेळायचे आहे. धोनीने त्याच्या चाहत्यांसाठी २०२४ मध्ये आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले होते. धोनीने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जसाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. अशा परिस्थितीत त्याला या हंगामातही संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे.

चेन्नई सुपर किंग्सने जुन्या खेळाडूंवर व्यक्त केला विश्वास  

आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या जुन्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. चेन्नई संघाने बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्याचे काम केले आहे. त्यांनी काही खेळाडूंना सोडले देखील असून त्यात बेन स्टोक्सचा समावेश आहे. तो स्वतः आयपीएलपासून दूर गेला आहे.

हेही वाचा: IPL 2024: पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्याने बुमराह नाराज आहे का? भारताच्या माजी कर्णधाराने केले मोठे विधान

महेंद्रसिंग धोनीची ही आयपीएल कारकीर्द आहे

२०१९ साली महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. जर धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने २५० सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला आहे. आयपीएल २०२३मध्ये महेंद्रसिंग धोनीने १३५.९२च्या स्ट्राईक रेटने आणि ३८.७९च्या सरासरीने धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ८७ धावा आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये २४ वेळा अर्धशतक ठोकले होते.

Story img Loader