IPL 2024: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. त्याआधी फ्रँचायझींमध्ये खेळाडूंबाबत खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. या क्रमवारीत राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात करार झाला आहे. राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडिक्कल पुढील वर्षी के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज आवेश खान राजस्थान संघात सामील झाला आहे.

आवेश खानची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. त्याला लखनऊने २०२२ मध्ये १० कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुसरीकडे, देवदत्त पडिक्कलला राजस्थानने ७.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. यंदाच्या आयपीएलपूर्वी आवेश आणि देवदत्त यांना त्यांच्या संघांनी कायम ठेवले होते.

Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग

पडिक्कलला राजस्थानकडून चांगली कामगिरी करता आली नाही

देवदत्त आणि आवेश यांनी आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती, पण २०२३च्या मोसमात त्यांची कामगिरी चांगली नव्हती. विशेषत: पडिक्कल २०२२ मध्ये १७ सामने आणि २०२३ मध्ये ११ सामने खेळूनही राजस्थानसाठी आपली छाप सोडू शकला नाही. त्याने दोन हंगामात २८ सामन्यात २३.५९च्या सरासरीने आणि १२५.८८च्या स्ट्राईक रेटने ६३७ धावा केल्या. या काळात त्याला केवळ तीन अर्धशतके करता आली.

पडिक्कलचा तिसरा संघ सुपर जायंट्स असेल

पडिक्कलने आयपीएलमधील एकूण ९२ सामन्यांमध्ये ३३.३४च्या सरासरीने २७६८ धावा केल्या आहेत. त्याने तीन शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३३.५२ आहे. लखनऊ सुपर जायंट्स हा पडिक्कलचा तिसरा आयपीएल संघ असेल. यापूर्वी तो २०२० आणि २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता.

आवेशने दिल्लीसाठी पदार्पण केले

आवेश खानबद्दल जर सांगायचे तर राजस्थान रॉयल्स हा त्याचा तिसरा संघ असेल. त्याने २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २४ विकेट्स घेतल्या. यानंतर दिल्लीने त्याला मेगा-लिलावासाठी संघातून वगळले. लिलावात तिन्ही संघांना हरवून लखनऊने आवेशला विकत घेतले होते. २०२२ मध्ये, तो लखनऊसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता आणि त्यांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला.

लखनऊमध्ये आवेश प्रभावी नव्हता

२०२३ मध्ये लखनऊच्या संथ खेळपट्ट्यांवर आवेशची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही. त्याला नऊ सामन्यांत केवळ पाच वेळा चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला. या मोसमात त्याला केवळ आठ विकेट्स मिळाल्या. आवेश डिसेंबरमध्ये २७ वर्षांचा होईल. तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. राजस्थानमध्ये त्याला प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, कुलदीप सेन, संदीप शर्मा आणि के.एम. आसिफ यांची साथ मिळेल.

हेही वाचा: Mohammed Shami: मोहम्मद शमी आजारी आईला पाहताच झाला भावूक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबईनेही लखनऊशी केला व्यवहार

आगामी आयपीएल हंगामापूर्वी होणारा असा हा दुसरा व्यापार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सकडून रोमॅरियो शेफर्डचा व्यवहार केला होता. सर्व संघांना २६ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. १९ डिसेंबर रोजी दुबई येथे लिलाव होणार आहे.