IPL Gujarat Titans Full Squad List: हार्दिक पंड्याच्या जाण्याने गुजरात टायटन्सचे निश्चितच नुकसान झाले आहे आणि संघ त्याची भरपाई करू शकत नाही. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघ दोन वर्षे अंतिम फेरीत पोहोचलाह होता. यातून २०२२मध्ये संघ चॅम्पियनही झाला होता. यंदा गुजरातने लिलावात हार्दिकची जागा शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते फारसे शक्य झाले नाही. शाहरुख खान आणि अष्टपैलू अझमतुल्ला उमरझाई या दोघांना संघात घेतले आहे, त्यामुळे पंड्याची भरपाई होईल की नाही हे येणारा काळच सांगू शकेल.

एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज अझमतुल्ला उमरझाई याला फ्रँचायझीने निश्चितपणे ५० लाख रुपयांना विकत घेतले, पण तो हार्दिक पंड्याची भरपाई करू शकेल की नाही हे येणाऱ्या आयपीएल २०२४मध्येच कळेल. याशिवाय फिनिशरच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला विकत घेऊन गुजरातने नक्कीच चांगले काम केले. जर या दोघांनी शानदार कामगिरी केल्यास गुजरात टायटन्स नक्कीच पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकू शकतो.

याशिवाय यश दयाल, अल्झारी जोसेफ यांच्या जागी स्पेन्सर जॉन्सन आणि उमेश यादव यांना खरेदी करण्यात आले. गुजरातची गोलंदाजीची फळी खूपच मजबूत दिसत आहे, ज्यामध्ये उमेश, मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश असेल. याशिवाय जोशुवा लिटल आणि स्पेन्सर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. राशिद खान आणि नूर अहमद या फिरकीपटूंची जोडगोळी देखील संघाच्या ताफ्यात आहे. एकूणच गुजरात टायटन्सचा संघ पुन्हा एकदा मजबूत दिसत आहे. शुभमन कसा कर्णधार ठरतो हे पाहणे बाकी आहे. ऋद्धिमान साहाचा बॅकअप म्हणून अनुभवी भारतीय यष्टीरक्षकाच्या अनुपस्थितीत, केन विल्यमसनला प्लेइंग-11 मध्ये फिट करण्यासाठी फ्रँचायझीला संघर्ष करावा लागू शकतो.

हेही वाचा: IPL 2024 Auction: लिलावात चाहत्यांनी रोहितबद्दल प्रश्न विचारताच आकाश अंबानीने केले सूचक विधान; म्हणाला, “चिंता करू नका…”

संघातील कायम खेळाडू: शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर. साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा.

लिलावात विकत घेतले: अजमतुल्ला उमरझाई (५० लाख रुपये), उमेश यादव (५.८० कोटी), शाहरुख खान (७.४कोटी), सुशांत मिश्रा (२.२ कोटी), कार्तिक त्यागी (६० लाख), मानव सुथार (२० रुपये) लाख), स्पेन्सर जॉन्सन (रु.१० कोटी), रॉबिन मिन्झ (३.६ कोटी).

हेही वाचा: विश्लेषण : ‘आयपीएल’मधील आजवरच्या सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंची कामगिरी कशी? काही सौदे तोट्यात गेले का? 

भूमिकेनुसार संपूर्ण टीम

सलामीवीर: शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक)

मध्यक्रम: केन विल्यमसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, साई सुधरन, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शाहरुख खान, रॉबिन मिन्झ (यष्टीरक्षक)

अष्टपैलू: राहुल तेवतिया, जयंत यादव, विजय शंकर, अझमतुल्ला उमरझाई

वेगवान गोलंदाज: मोहम्मद शमी, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे, उमेश यादव, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, जोश लिटल, स्पेन्सर जॉन्सन

फिरकीपटू: राशिद खान, नूर अहमद, आर साई किशोर, मानव सुथार

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग११

शुबमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा, साई सुदर्शन/मोहित शर्मा (इम्पॅक्ट सब), विजय शंकर, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, स्पेन्सर जॉन्सन.