मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२४ साठी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या याचं नाव जाहीर केलं आहे. मुंबई इंडियन्सने अधिकृत पत्रक काढत ही घोषणा केली आहे. यामुळे रोहित शर्मा याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला आहे. आता मुंबई इंडियन्सने ‘एक्स’ अकाउंटवर ( ट्वीटर ) रोहित शर्माबद्दल भावनिक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

अष्टपैलू हार्दिक पांड्याला मुंबईने नुकतंच गुजरात टायटन्सला १५ कोटी रूपये देऊन आपल्या ताफ्यात घेतलं होतं. आता रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा १० वर्षे झालं मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वात मुंबईने सहा वेळा ‘आयपीएल’च्या चषकावर नाव कोरलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

हेही वाचा : रोहित शर्मा कर्णधार झाला आणि मुंबई इंडियन्सचं पालटलं नशीब

हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केल्यावर मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर लिहिलं, “२४ एप्रिल २०१३ साली तू मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. तू विश्वास ठेवायला शिकवले. पराभव असो किंवा विजय, तू नेहमीच हसत राहायचा.. १० वर्षात सहावेळा चषकावर आपण नाव कोरलं. तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील… तुझा वारसा ‘ब्लू आणि गोल्ड’मध्ये कोरला जाईल… धन्यवाद रोहित…”

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धन यांनीही रोहित शर्माबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भविष्याच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल उचललं आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन, सिंग, रिकी पाँटिंग ते रोहित शर्मासारख्या दिग्गजाचं नेतृत्व मुंबई इंडियन्सला लाभलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाचं शिखर गाठलं आहेत. आता भविष्याच्या दृष्टीनं संघाला मजबूत करण्यासाठी निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.”

Story img Loader