IPL 2024 Hardik Pandya: IPL मधली सर्वात मोठी घडामोड म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं, त्या करारावर अखेर रविवारी रात्री शिक्कामोर्तब झालं. यानुसार गुजरात टायटन्सला आयपीएलचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या आता स्वगृही अर्थात मुंबई संघात डेरेदाखल होणार आहे. रविवारी संध्याकाळी यासंदर्भात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. आधी हार्दिकला गुजरातनं आपल्याकडेच ठेवल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र, आता हार्दिक मुंबईकडे परतणार असल्याच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालं असून फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

१२ डिसेंबरपर्यंत अदलाबदलीचा निर्णय शक्य!

१९ डिसेंबरला दुबई येथे खेळाडू लिलावप्रक्रिया पार पडणार असून त्यापूर्वी १२ डिसेंबरपर्यंत संघांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा आहे. आता हार्दिक मुंबई संघात परतण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी रविवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
Odisha Forest Department started efforts to bring back Zeenat tigress that entered forests of Jharkhand
‘झीनत’ला परत आणण्यासाठी वनविभागाचे जोरदार प्रयत्न; नेमक झालं काय?
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…

हार्दिकच्या ‘घरवापसी’ची सर्व प्रक्रिया पूर्ण!

गेल्या काही दिवसांपासून हार्दिकबाबत बरीच चर्चा सुरू होती. ‘आयपीएल’ पदार्पणापासून सात वर्षे मुंबईकडून खेळलेल्या हार्दिकने गेल्या दोन हंगामांत गुजरात संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२च्या हंगामात जेतेपद, तर २०२३च्या हंगामात उपविजेतेपद मिळवले होते. मात्र, तो आता मुंबई संघात परतणार आहे. ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ अधिकारी आणि ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीतील सदस्याच्या माहितीनुसार, हार्दिक मुंबई संघात परतणार हे निश्चित झाले आहे. मात्र, दोन्ही संघांनी रविवारी सायंकाळी ५ वाजेपूर्वी करारांवर स्वाक्षरी न केल्याने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

हार्दिकच्या खरेदीसाठी मुंबईनं ग्रीनला बंगळुरूसाठी सोडलं!

हार्दिकच्या मोबदल्यात गुजरात संघाला १५ कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी मुंबईच्या संघाने हार्दिकला खरेदी करता यावे यासाठी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडे पाठवल्याची चर्चा आहे. ग्रीनला मुंबईने गेल्या खेळाडू लिलावात १७.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. आता बंगळूरुला इतकीच रक्कम मुंबईला द्यावी लागणार आहे.

विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्या झाला भावुक; म्हणाला, “हे पचवायला खूप…”

दरम्यान, मुंबईने जोफ्रा आर्चर, कोलकाता नाइट रायडर्सने शार्दूल ठाकूर, तर बंगळूरुने वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला.

हार्दिकला मिळणार ट्रान्स्फर फी!

दरम्यान, हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सनं सोडल्यानंतर त्यांना मुंबई इंडियन्सकडून त्याच्या किंमतीचे १५ कोटी मिळणार आहेत. मात्र, त्याच्या बरोबरीने हार्दिकचं हस्तांतरण मूल्य अर्थात ट्रान्स्फर फीदेखील मुंबई इंडियन्सला चुकवावी लागणार आहे. ही फी किती असेल, यासंदर्भात गुजरात टायटन्सला आयपीएल व्यवस्थापनाला कळवावं लागेल. करारपत्रानुरार या फीमधील निम्मी रक्कम हार्दिक पंड्याला मिळणार आहे.

Story img Loader