आयपीएल ही टी-२० लीग भारतात एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नसते. यंदाचा मोसम येत्या २२ मार्चपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने आतापर्यंत केवळ २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र आता आयपीएलचे उर्वरित सामने निवडणुकांमुळे दुबईमध्ये खेळवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलच्या दुसऱ्या भागातील सामने दुबईत होण्याची शक्यता आहे, कारण निवडणुका सुरू असताना सामने खेळवणं शक्य होणार नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी ३ वाजता निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर आयपीएलचे सामने दुबईमध्ये खेळवायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआय घेईल. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी दुबईत आयपीएलच्या दुसरा भागाचे आयोजन करता येईल का ही हे पडताळून पाहण्यासाठी दुबईमध्ये आहेत.

आयपीएलच्या काही संघांनी त्यांच्या खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट देण्यास सांगितले असल्याच्या बातम्याही माध्यमांमधून येत आहेत. IPL 2014 मधील सुरूवातीचे सामनेदेखील सार्वत्रिक निवडणुकांमुळे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये आयोजित करण्यात आल होते. BCCI ने आयपीएलच्या पहिल्या भागाचे वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये २१ सामन्यांचा समावेश आहे, या वेळापत्रकानुसार अखेरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ७ एप्रिलला लखनऊ येथे होणार आहे.

२०२१ मध्येही यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. आयपीएलचा २०२० चा संपूर्ण हंगाम कोविडमुळे भारतात न होता यूएईमध्ये खेळवण्यात आला होता. तर २००९ चा आयपीएल हंगाम हा दक्षिण आफ्रिकेत झाला होता, ज्यामध्ये अ‍ॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्त्वाखालील डेक्कन चार्जस संघाने विजय मिळवला होता.

आयपीएलच्या या हंगामाची सुरुवात चेन्नईच्या घरच्या मैदानावर २२ मार्चला होणार आहे. ज्यामध्ये गतवर्षीचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 second leg might shift dubai due to lok sabha elections as per reports bdg