भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला परत मिळवण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळालं आहे. इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) क्रिकेटच्या आगामी हंगामाकरिता खेळाडू कायम ठेवण्यासाठी आणि करारमुक्त करण्यासाठी दहाही संघांना रविवारी ( २६ नोव्हेंबर ) सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळा होता. त्यानंतर सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.

यात गुजरात टायटन्सने हार्दिकला संघात कायम ठेवलं होतं. मात्र, त्यांना हार्दिक मुंबईकडे परतण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्दिक पंड्यानंतर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुबमन गिलची वर्णी लागण्याची शक्यता ‘एनडीटीव्ही’च्या सूत्रांनी वर्तवली आहे.

१९ डिसेंबरला दुबई येथे खेळाडू लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी १२ डिसेंबरपर्यंत खेळाडून अदलाबदल करण्याची मुभा आहे. हार्दिक पंड्या मुंबई संघात परतण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी रविवारी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

हेही वाचा : विश्लेषण : सूर्यकुमारने केवळ ट्वेन्टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे का? एकदिवसीय क्रिकेटमधील अपयशामागे कोणती कारणे?

‘आयपीएल’ पदार्पणापासून सात वर्षे मुंबईकडून खेळलेल्या हार्दिकने गेल्या दोन हंगामात गुजरात संघाचे नेतृत्व केलं आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने २०२२च्या हंगामात जेतेपद आणि २०२३ च्या हंगामात उपविजेतेपद मिळवलं होतं. मात्र, हार्दिक मुंबई संघात परतणार आहे.

हार्दिकच्या मोबदल्यात गुजरात संघाला १५ कोटी रूपये मिळतील. तर, हार्दिक खरेदी करता यावे म्हणून मुंबई संघाने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडे पाठवल्याची चर्चा आहे. हार्दिकनंतर शुबमन गिल गुजरात संघाची कमान संभाळणार आहे.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्स

कायम : रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कॅमरुन ग्रीन, शम्स मुलानी, जसप्रीत बुमरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, नेहाल वढेरा, आकाश मधवाल, विष्णू विनोद, जेसन बेहरनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड.

करारमुक्त : अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकिन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यान्सन, झाय रिचर्डसन, रायली मेरेडिथ, ख्रिास जॉर्डन, संदीप वॉरियर.

गुजरात टायटन्स

कायम : डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रशीद खान, जोश लिटल, मोहित शर्मा.

करारमुक्त : यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दसून शनाका.

हार्दिक पंड्या ( मुंबईकडे परतणार )