IPL Auctioneer Mallika Sagar: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मल्लिका सागरची इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या खेळाडूंच्या लिलावासाठी लिलावकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल २०२४चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोकाकोला एरिना येथे होणार आहे. यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात मलिष्का सागरचाही मोठा वाटा होता. यापूर्वी बीसीसीआय आयपीएल लिलावासाठी चारू शर्मा, रिचर्ड मॅडले किंवा ह्यू अॅडम्स हे लिलावकर्त्याची भूमिका बजावत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षाच्या सुरुवातीला महिला प्रीमियर लीग लिलावाच्या उद्घाटन सत्रादरम्यान मल्लिकाही आली होती. आयपीएल लिलावासाठी बीसीसीआय सहसा रिचर्ड मॅडली किंवा ह्यू अ‍ॅडम्स यांना सांगते. परंतु, २०२२ मध्ये मेगा-लिलावादरम्यान अ‍ॅडम्स “पोस्चरल हायपोटेन्शन” मुळे बेशुद्ध झाल्यामुळे, बीसीसीआय कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही.

कोण आहे मल्लिका सागर? पीकेएल लिलावातही दिसली होती

स्पोर्ट्स लीगमधील खेळाडूंच्या लिलावासाठी मल्लिका अनोळखी नाही, तिने २०२१ मध्ये प्रो कबड्डीचा लिलावा दरम्यान लिलावकर्त्याची भूमिका पार पाडली होती. मुंबईत राहून ती सल्लागार म्हणून काम करते. तिंच लिलावातील प्रवास २००१ मध्ये क्रिस्टीज या प्रसिद्ध ब्रिटिश लिलावामधून सुरू झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला डब्ल्यूपीएल लिलावापूर्वी एका मुलाखतीत, मल्लिकाने बीसीसीआयला लिलावाची जबाबदारी सोपवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “भारतीय महिलांना अखेरीस आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे हक्क मिळतील, त्यांच्याकडे क्षमता असेल. उच्च स्तरावर खेळण्यासाठी ही लीग खूप अनुभव देऊन जाईल.”

आयपीएल २०२४च्या लिलावाची प्रक्रियेला फार कमी दिवस शिल्लक आहेत. यासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या बलाढ्य संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे आक्रमक खेळाडू असूनही एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी, आरसीबीची लिलावात दोन खेळाडूंवर नजर आहे. यावेळी ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवतील अशी आशा त्यांना वाटते.

आरसीबीकडे नेहमीच आक्रमक फलंदाज आहेत. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी फ्रँचायझीसाठी अप्रतिम फलंदाजी केली आहे. जर आपण काही काळ मागे गेलं तर एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारख्या आक्रमक फलंदाजांनीही आरसीबीसाठी मोठी धावसंख्या उभारली आहे. मात्र, आजपर्यंत या संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यामागे कमकुवत गोलंदाजी हेही कारण मानले जात आहे.

आरसीबीने लिलावापूर्वी वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला आधीच सोडले आहे, ज्याला त्यांनी पूर्ण १०.७५ कोटी रुपयांमध्ये समाविष्ट केले होते. हर्षल हा आयपीएलच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आयपीएल २०२१ मध्ये, त्याने सीएसकेच्या जडेजाला गोलंदाजी करताना आरसीबीसाठी ३७ धावा दिल्या. मात्र, त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि रीस टॉपले यांना कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत यावेळी आयपीएल लिलावात आरसीबी संघात समतोल राखण्याचे ध्येय ठेवणार आहे.

हेही वाचा: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संजू सॅमसनने केली दावेदारी पक्की, विजय हजारे ट्रॉफीत झळकावले शानदार शतक

यंदाच्या आयपीएल लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या यादीत ८३० खेळाडूंसह भारतीयांचे वर्चस्व आहे, तर उर्वरित ३३६ विदेशी खेळाडू आहेत. मात्र, सर्व १० फ्रँचायझीकडे केवळ ७७ खेळाडू खरेदी करू शकतात एवढीच जागा शिल्लक आहे. ज्यात ३० परदेशी आणि ४७ भारतीय असतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 who is mallika sagar know the role of an auctioneer in ipl auctions avw
Show comments