IPL 2024 Auction, Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर, सोशल मीडियावर फ्रँचायझींवर टीका होत आहे. संघाच्या या निर्णयावर चाहते सोशल मीडियावर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे रोहित शर्मा संघ सोडू शकतो, असे बोलले जात आहे. एक किंवा दोन फ्रँचायझींनी व्यापारासाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल चौकशी केल्याचे वृत्त देखील होते. रोहित व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल असेही बोलले जात आहे की ते दोघेही दुसऱ्या संघात सामील होऊ शकतात. मात्र, याला मुंबई इंडियन्सने कुठलाही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाऊ शकतात, असेही सोशल मीडियावर बोलले जात होते. या संदर्भात, चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी त्यांची फ्रँचायझी मुंबईबरोबरच्या कोणत्याही संभाव्य व्यापारापासून दूर आहे. एका मुलाखतीत विश्वनाथन म्हणाले की, “कोणत्याही खेळाडूची खरेदी-विक्री सीएसकेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. सध्या असा एकही खेळाडू नाही की ज्याची फ्रेंचायझी मुंबईशी व्यापार करू शकेल. त्यामुळे या चर्चा निरर्थक आहेत.”

हेही वाचा: IPL 2024 Auction: “परदेशी खेळाडूंसाठी वेगळी पर्स…”, अनिल कुंबळेने सॅलरी कॅपबाबत केले मोठे विधान

आम्ही कोणाशीही संपर्क साधला नाही: CSK CEO

“तत्त्वानुसार, आम्ही खेळाडूंचा व्यापार करत नाही आणि आमच्याकडे मुंबई इंडियन्सबरोबर व्यापार करण्यासाठी खेळाडू नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा तसा कुठलाही हेतू नाही. आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही.” काशी विश्वनाथन दुबईतील लिलावादरम्यान यांनी, रोहित शर्माच्या सीएसकेमध्ये येणाच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम दिला.

कधीतरी निर्णय घ्यावा लागतो: जयवर्धने

लिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सचे जागतिक क्रिकेट प्रमुख महेला जयवर्धने याला रोहितकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले. तो म्हणाला की, “कधी कधी असे कठीण निर्णय घ्यावा लागतो. आता हिटमॅनने त्याचा उत्तराधिकारी हार्दिकला मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. शेवटी संघ हा सर्वतोपरी असतो.”

हेही वाचा: IPL 2024 Auction: कमिन्स, स्टार्कवर एवढी रक्कम खर्च केल्याबद्दल अनिल कुंबळेने नाराजी व्यक्त केली; म्हणाला, “ हा मूर्खपणा…”

जयवर्धने पुढे म्हणाला, “पुढील पिढीला मैदानावर आणि मैदानाबाहेर मार्गदर्शन करण्यासाठी रोहित शर्मा संघात असणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रोहितबरोबर मी खूप जवळून काम केले आहे. तो एक विलक्षण माणूस आहे आणि मला खात्री आहे की तो या वारशाचा एक भाग असेल. तरुणांबरोबर खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरबरोबरही मुंबईने असेच काहीसे केले होते. त्याने नेतृत्व दुस-याकडे दिले आणि मुंबई इंडियन्स योग्य मार्गावर जात असल्याची खात्री करून घेतली. तीच गोष्ट आता आम्ही करत आहोत. आम्ही याबाबत फ्रँचायझींबरोबर दीर्घ चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 will mumbai indians rohit sharma play for chennai super kings csk ceo replied avw
Show comments