Rohit Sharma CSK Viral Post Ritika Sajdeh: मुंबई इंडियन्सने शुक्रवारी संध्याकाळी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते. जवळपास या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत आणि त्या विषयावर अजूनही चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांचा रोष सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्ससह दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझीने, रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केला. या व्हिडीओवर रोहितही पत्नी रितिकाच्या कमेंटची चर्चा आहे. त्याच वेळी, चेन्नईच्या एका माजी क्रिकेटपटूने रोहितला चेन्नई सुपर किंग्जमध्ये आणण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे, याबाबत त्याने ट्वीटरवर ट्वीट केले आहे.

बद्रीनाथची पोस्ट व्हायरल झाली

चेन्नई सुपर किंग्जचे माजी खेळाडू आणि टीम इंडियाकडून खेळलेले सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या जर्सीतील रोहित शर्माचा फोटो शेअर केला आहे. मात्र, हा एडिट केलेला फोटो आहे. पण त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “काय तर…”म्हणजेच त्याला सांगायचे होते की जर रोहित शर्मा सीएसके मध्ये आला तर. ही पोस्ट रोहितच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. यावर रोहितची पत्नी रितिकाने देखील इमोजी कमेंट केली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

रितिकाच्या कमेंटवरही सोशल मिडियात चर्चा

चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्मासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर रोहित शर्माच्या पत्नीने कमेंट केली आहे. या पोस्टच्या कमेंटवर तिने पिवळे रंगाचे हृदय म्हणजेच हार्ट पोस्ट केले. याचा अर्थही ट्वीटरवर वेगळा घेतला जात आहे. लोकांनी असेही म्हटले की रोहित सीएसकेमध्ये येऊ शकतो, हे याचे स्पष्ट संकेत आहे.

मात्र, सध्या या सर्व केवळ अफवा आहेत. सध्या असे काहीही नाही आणि आगामी हंगामात फक्त एम.एस. धोनीच संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, सोशल मीडियावर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले. कोणीतरी मुंबई इंडियन्सची जर्सी, ध्वज आणि टोपी जाळली. त्याच वेळी, रोहितच्या समर्थनात मुंबई इंडियन्सला फॉलो करणं चाहत्यांनी थांबवल आहे. फ्रँचायझीच्या फॉलोअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे.

इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सचे ४ लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत

रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसेल, तर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुंबई इंडियन्सवर सोशल मीडियावर टीका होत आहे, त्याचा परिणाम संघाच्या सोशल मीडिया पेजवरही दिसून आला. मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर ४ लाख फॉलोअर्स कमी केले आहेत. रोहित शर्माने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले, तेव्हापासून या फ्रँचायझीने सातत्याने यश मिळवले आहे. रोहित शर्माने कर्णधार बनून पहिल्याच वर्षी मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले, त्यानंतर १० वर्षांच्या कर्णधारपदाच्या प्रवासात रोहितने मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवले.

हेही वाचा: AUS vs PAK 1st Test: तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सीटवर, पाकिस्तानविरुद्ध घेतली ३०० धावांची आघाडी

रोहितच्या जागी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पंड्या अचानक गुजरात टायटन्स सोडून आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. याआधी हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. हार्दिक २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. आयपीएल २०२३ मध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्याने पहिल्याच सत्रात संघाला चॅम्पियन बनवले आणि यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला.

Story img Loader