IPL 2025 Auction Date and Venue: अलीकडेच, सर्व फ्रँचायझींनी आयपीएल २०२५ पूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक संघांनी कर्णधारांना रिलीज केले आहे त्याचबरोबर होणाऱ्या आयपीएल लिलावात अनेक मोठे खेळाडू दिसणार आहेत. यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. रिटेंशननंतर आता आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव कधी होणार, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण यादरम्यान लिलावाची तारीख आणि ठिकाण याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IPL 2025 च्या लिलावाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. IPL २०२५ मेगा लिलावाचे ठिकाण आणि तारखेबाबत मोठी अपडेट सध्या रिपोर्टमधून समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरीस आयपीएल २०२५ मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. एएनआयने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. अद्याप बीसीसीआयने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव २४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान रियादमध्ये होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून या महिन्याच्या अखेरीस मध्यपूर्वेतील एका मोठ्या शहरात मेगा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात होती, जी आता जवळपास निश्चित मानली जात आहे. सर्व संघ आयपीएल लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी लिलावात एकापेक्षा एक मोठे आणि खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसणार आहेत. ज्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार आणि कोणत्या खेळाडूंना राईट टू मॅच वापरून संघात घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

IPL 2025 लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

  • चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी
  • दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल
  • गुजरात टायटन्स: राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान
  • कोलकाता नाइट रायडर्स: रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग</li>
  • लखनौ सुपर जायंट्स: निकोलस पुरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बदोनी
  • मुंबई इंडियन्स : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा
  • राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा
  • सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड
  • पंजाब किंग्स : शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 auction likely to be held in riyad on november 24 or 25 as per reports bdg