IPL 2025 Auction: IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. हा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिंसेबरच्या सुरूवातीला होणार आहे. या मेगा लिलावापूर्वी, सर्व संघ राईट टू मॅच कार्डसह जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करू शकतात. एखाद्या संघाने ५ खेळाडूंना कायम ठेवल्यास, त्यांना लिलावाच्या वेळी एक RTM वापरण्याची संधी असेल. ६ खेळाडूंना कायम ठेवताना, संघात ५ कॅप्ड खेळाडू तर एक अनकॅप्ड खेळाडूचाही समावेश असेल. सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलकडे सादर करायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केएल राहुल मेगा लिलावात उतरणार?

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्स संघ ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. विशेष म्हणजे यात केएल राहुलच्या नावाचा समावेश नाही. गेल्या ३ हंगामात तो आयपीएलमध्ये या संघाचे नेतृत्व करत होता, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली लखनौ संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. त्याच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Emerging Asia Cup: नवा आशिया चॅम्पियन! अफगाणिस्तानने भारतानंतर श्रीलंकेला दणका देत घडवला इतिहास, विजयाचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO

लखनौ सुपर जायंट्स संघ निकोलस पुरन, मयंक यादव, रवी बिश्नोई यांना कॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यासाठी तयार आहे. याशिवाय मोहसीन खान आणि आयुष बडोनी या युवा खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकतात. अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझीला ४ कोटी रुपये खर्च करावे लागतील. या पाच खेळाडूंचे लखनौ संघात पुनरागमन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय मेगा लिलावासाठी लखनऊ संघाक़े आरटीएमचा पर्यायही असेल.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

या खेळाडूला मिळू शकते कर्णधारपदाची जबाबदारी

लखनौचा संघाच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत निकोलस पुरन पहिल्या स्थानी असू शकतो आणि त्यासाठी १८ कोटी रुपये संघ खर्च करू शकतो, असे मानले जात आहे. IPL 2024 मध्ये केएल राहुलच्या अनुपस्थितीतही पुरनने संघाची कमान सांभाळली होती. तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो स्वत:च्या फलंदाजीच्या जोरावर सामना फिरवू शकतो, यष्टिरक्षकाची जबाबदारीही तो पार पाडू शकतो. त्याने आतापर्यंत ७६ IPL सामन्यांमध्ये १७६९ धावा केल्या आहेत, ज्यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे. लखनौचा संघ त्याला कर्णधारही बनवू शकतो.

लखनौ संघाने आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर संघ एलिमिनेटरच्या पुढे जाऊ शकला नाही. याशिवाय, संघाने आयपीएल २०२४ मध्ये अत्यंत खराब कामगिरी केली. या मोसमात ते प्लेऑफपर्यंत पोहोचण्यापासून खूप दूर होते तर पॉइंट टेबलमध्ये ७व्या क्रमांकावर होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 auction lucknow super giants to retain 5 players but kl rahul is not in list bdg