IPL 2025 Auction Rajasthan Royals Set To Retain 3 Star Players : आयपीएल २०२५ साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. पण, त्याआधीच काही फ्रँचायझीं कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहेत, याबाबत संकेत देत आहेत. राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनला पहिल्या पसंतीचा खेळाडू म्हणून कायम ठेवण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच १८ कोटी रुपये देऊन संजू सॅमसनला कायम ठेवणार असल्याचे समजते. अर्थात, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, राजस्थान रॉयल्सकडून शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमधील फोटोवरुन हे स्पष्ट होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोमधून हे संजू सॅमसनला कायम ठेवले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हा फोटो स्वतः राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे, ज्याचे कॅप्शन आहे ‘बिग वीक’ म्हणजे मोठा आठवडा. या फोटोची खास गोष्ट म्हणजे यात ते सर्व चेहरे दिसत आहेत ज्यांना राजस्थान रॉयल्सचा थिंक टँक म्हटले जाते. ज्यामध्ये संघाचा कर्णधार संजू सॅमसनही दिसत आहे. या फोटोमधील सॅमसनची उपस्थिती पाहून, तो कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंमधील राजस्थान फ्रँचायझीची पहिली पसंती असणार आहे.

संजू सॅमसनला कायम ठेवणार असल्याचे जवळपास निश्चित –

राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा राहुल द्रविडची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असून त्याच्या आगमनानंतर या संघात अनेक बदल पाहायला मिळतील, असे मानले जात आहे. द्रविडच्या आगमनानंतर राजस्थानला आशा आहे की त्याच्या देखरेखीखाली हा संघ पुन्हा आयपीएल चॅम्पियन बनू शकेल. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राजस्थान संघ निश्चितपणे संजूसह, यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांना या सीझनसाठी कायम ठेवू शकतो आणि यावर एक करारही झाला आहे. या तिन्ही खेळाडूंनी या संघासाठी चांगली कामगिरी केली असून हे तिघेही टीम इंडियाचा भाग आहेत.

हेही वाचा – दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी गौतम गंभीर ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण असणारा भारताचा कोच, नेमकं कारण काय? जाणून घ्या

याशिवाय राजस्थान रॉयल्स संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलसाठी आरटीएम कार्ड वापरण्याचा विचार करत आहे. चहल आयपीएल २०२२ मध्ये या संघात सामील झाला होता आणि तेव्हापासून तो या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. चहलने आयपीएल २०२४ मध्ये १८ विकेट घेतल्या होत्या. त्यामुले युजवेंद्र चहलसाठी आरटीएमच्या माध्यमातून संघा सामील होणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 auction rajasthan royals set to retain 3 star players sanju samson and yashasvi jaiswal riyan parag vbm