IPL 2025 KKR Appointed New Mentor: आयपीएल २०२५ च्या हंगामापूर्वी अनेक संघांमध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. आयपीएल २०२५ सुरू होण्यासाठी बराच वेळ असला तरी संघांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून लवकरच रिटेनशन पॉलिसी जारी करण्यात येणार असल्याची बातमी आहे. परंतु संघांनी त्यांच्या सपोर्ट स्टाफला आणखी मजबूत करण्यासाठी निर्णय घेत आहेत. आता KKR आणि CSK बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. केकेआरने गौतम गंभीरच्या जागी आपल्या नवीन मार्गदर्शकाची घोषणा केली आहे. CSK साठी हा एक धक्का असू शकतो.

आयपीएलचा सध्याचा चॅम्पियन संघ, KKR म्हणजेच कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या नवीन मार्गदर्शकाची घोषणा केली आहे. केकेआरने म्हटले आहे की, वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेला ड्वेन ब्राव्हो आता त्यांचा नवा मार्गदर्शक असेल. यापूर्वी ड्वेन ब्राव्हो सीएसकेच्या संघाचा भाग होता, याच संघाकडूनही तो खेळला आहे.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Maharera decided to limit self regulatory body representatives tenure
मक्तेदारी मोडीत काढून टाकण्यासाठी महारेराने घेतला मोठा निर्णय
jayam ravi changed his name
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

गेल्या काही हंगामांपासून तो गोलंदाजी सल्लागाराची भूमिका बजावत होता. ड्वेन ब्राव्हो हा मुंबई आणि CSK या दोन्ही संघांसाठी खेळलेला खेळाडू आहे. सीएसकेसाठी आयपीएल जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. २०११ पासून तो सतत चेन्नई सुपर किंग्जसोबत दिसत होता, पण आगामी सीझनमध्ये तो केकेआरच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा – IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत ९३ टक्के पावसाची शक्यता, कानपूरचू खेळपट्टी कोणाला करणार मदत? वाचा हवामान आणि पिच रिपोर्ट

गौतम गंभीर आयपीएल 2024 मध्ये केकेआरच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते, मात्र आता ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. कोलकाता नाईट रायडर्स गंभीरच्या अनुपस्थितीनंतर आयपीएलमध्ये चांगला अनुभव असलेल्या अनुभवी खेळाडूच्या शोधात होते. त्यानंतर आता ड्वेन ब्राव्होवर ही जबाबदारी सोपवली आहे. तर ड्वेन ब्राव्होने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आणि टी-२० लीगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर केकेआरने ही मोठी घोषणा केली.

ड्वेन ब्राव्होची क्रिकेट कारकीर्द

ड्वेन ब्राव्होने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ५८२ टी-२० सामने खेळले. या सामन्यांमध्ये ब्राव्होने ६३१ विकेट घेतल्या आणि ६९७० धावा केल्या. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ड्वेन ब्राव्होने ११ वेळा एका डावात ४ विकेट्स आणि टी-२० क्रिकेटमध्ये दोन वेळा ५ विकेट घेतल्या आहेत.

Story img Loader